सातारा 

​मोस्ट वाँटेड ‘जकल्या’च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

सातारा (महेश पवार) :

गेल्या चार  वर्षांपासून फरार असलेल्या जक्कल उर्फ जकल्या रंगा काळे या अट्टल गुन्हेगारास रेवडी ता. कोरेगाव येथून आज सातारा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ४ लाख ६८ हजार रुपये किमतीचे १० तोळे सोने हस्तगत  करण्यात आले आहे. .

जकल्या हा खंडाळा, कोरेगाव व वाई तालुक्यामध्ये रानावनात ऊसाचे शेतामध्ये लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी मजूराच्या वेषात वेशांतर करुन त्याचा शोध घेतला असता ११ जुलै २०२१ रोजी तो रेवडी ता.कोरेगाव जि. सातारा येथे ऊसाच्या शेतामध्ये लपला असल्याचे कळले. त्यानुसार जकल्या ज्या उसाच्या शेतात लपला होता त्या पूर्ण भागात शिताफीने सापळा रचून त्याला पकडण्यात आले. त्याच्यावर २ खून, २ जबरी चोरी, ९ घरफोडी, २ चोरी आणि १ वेळा अटकेतून फरार असे एकूण १६ गुन्ह्यांची नोंद आहे.

अटक केल्यानंतर त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट कारेगाव यांचे कोर्टातुन ५ दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे हे करीत आहेत. पोलीस कोठडीमध्ये त्याने कोरेगाव, वाठार, मेढा, बाई, भुईंज, सातारा तालूका, खंडाळा या पोलीस ठाणे हद्दीत एकूण १० घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून त्याचेकडून आतापर्यंत ४ लाख ६८ हजार रुपये किमतीचे १० तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.

अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक, सातारा व धीरज पाटील, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, यांचे सुचनांप्रमाणे तसेच किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, सहा फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, पो. हवा. कांतीलाल नवघणे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, अतिश घाडगे पो.ना. शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, रवि वाघमारे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे, गणेश कापरे, अमित सपकाळ, पो.कॉ. विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, धीरज महाडीक, प्रविण पवार, विजय सावंत, गणेश कचरे यांनी सदरची कारवाई केलेली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: