पुणे 

कुणी लाटला ‘या’ गावातल्या कोंडवाड्याचा पैसा?

यवतमाळ (अभयकुमार देशमुख) :

जिल्ह्यातील नेर तालुक्यातील वटफळी – वटफळा गावातील बाजार हर्रास आणि कोंडवाड्यातील पैशाची अफरातफर केल्याबद्दल सरपंच उपसरपंचासह सदस्यांनी यवतमाळ जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना लेखी पत्राव्दारे चौकशी करण्याची मागणी केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण :
वटफळी- वटफळा गावात दरवर्षा २०१५ ते २०२० मध्ये झालेल्या बाजारांचा हर्रासांचा पैसा ग्रामपंचायतीला जमा न करता परस्पर हडप करण्यात आल्याचे या पत्रात म्हंटले आहे. तसेच याच कालावधीत गुरांच्या कोंडवाड्याचा पैसादेखील परस्पर गायब केल्याचे या पत्रात नमुद केले असून वटफळी – वटफळा गावच्या सरपंच, उपसरपंच याच्यासह सदस्यांच्या सह्या या पत्रावर आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी चौकशी करुन पैशाची अफरातफर करणाऱ्यावर कारवाई करणार ?

एका गावच्या सरपंचासह सर्व सदस्यांनी पत्राव्दारे चौकशीची मागणी केली आहे. ज्यांनी हा प्रकार केला आहे. त्यांच्यावर कारवाई होणार का नाही ? हि चर्चा सद्या वटफळी – वटफळा गावासह आसपासच्या गावात सुरु आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: