गोवा 

‘आमदार खरेदीसाठी ‘हा’ निधी गोळा करण्याचा मार्ग आहे का?’

'आप'ने विचारला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बोचरा प्रश्न 

पणजी :
मुख्यमंत्र्यांनी मायकल लोबो आणि बिल्डर लॉबीच्या मालमत्तांसाठी एफएआर वाढवण्यासाठी मिळालेला आपला वाटा उघड क​रावा,​ ​अशी ​मागणी आपने आज केली आहे. आगामी निवडणुकांसाठी अधिक आमदार खरेदी करण्यासाठी निधी गोळा करण्याचा हा त्यांचा मार्ग आहे का? शेवटच्या ओडीपी मधील एनजीपीडीएने लोबोच्या मालकीच्या मालमत्तेसह या विशिष्ट मालमत्तांसाठी झोन ​​बदलले आहेत,तर कळंगुट मधील स्थानिकांच्या मालकीच्या मालमत्ता अबाधित आहेत​, असा आरोप यावेळी आपने केला आहे. ​

 

​आपने आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये मुख्यमंत्री आणि भाजप सरकारवर ताशेरे ओढेले असून, या पत्रकानुसार, एफएआरमध्ये ही निवडक वाढ केवळ बिल्डर माफिया आणि स्थानिक भाजपा आमदारांना मदत करण्यासाठी आहे, यात शंका नाही. गोव्याला हे माहित असणे आवश्यक आहे की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या करारामधून किती वाटा मिळाला? सावंत यांनी या विषयावर मौन बाळगले यावरून हे दिसून येते की, स्वत: चे खिसे भरताना काहींच्या हितासाठी गोवा नष्ट करण्यात त्यांना जास्त रस आहे.

हे आठवणीत असायला हवे की,प्रमोद सावंत यांनी सौदे करून मालमत्ता मिळविली होती.त्यामुळे सावंत यांना आमदार आणि माफिया खरेदी करण्यास मदत झाली.बिल्डर माफियांना गोव्याच्या जमिनींचा ताबा मिळविण्यासाठी मोकळेपण दिल्यामुळे राज्यभरातील गोयंकरांना त्रास होत आहे.समुद्र किनारी पट्ट्यात प्रमोद सावंत बेकायदेशीररित्या डोंगर फोडणे,​ ​शेतात भराव भरणे आणि प्रकल्पांचे नियोजन पाहत आहेत. त्यांचे खिशात भरत असल्यामुळे त्यांच्यापैकी कोणीही यावर प्रश्न उपस्थित केला ना​ही, असे आपचे म्हणणे आहे. ​

प्रमोद सावंत यांनी बिल्डर माफिया व कळंगुट येथील आमदाराकडून मिळालेला वाटा जरूर वाटला पाहिजे, असे आप गोवा संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले.अधिसूचना म्हणते की, ही कृती लोकहितासाठी केली गेली,परंतु हे अगदी स्पष्ट आहे की केवळ लोबो आणि बिल्डर माफिया यांनाच यातून फायदा झाला​, असा आरोप त्यांनी यावेळी केला. .

स्वतःचे खिशे भरण्यात व्यस्त असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याने आणि आमदारांच्या पुढच्या फेरीतील खरेदीसाठी भाजपकडे पैसा असावा या उद्देशाने, हे काम मनापासून केले गेले आहे​, अशी बोचरी टीका यावेळी आपच्या वतीने करण्यात आली. ​

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: