गोवा 

‘बाबूने सत्तेत सहभागी होऊन विकास केला’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
भाजपा महिला शक्ती राज्यात सक्षम आहे ,​​आता विस्तारित आणि व्यापक  करण्यासाठी सर्व महिलाना संघटीत करून भाजपा सरकार बळकट करताना पुढील पाच वर्षासाठी भाजपचेच पूर्ण बहुमतांनी सरकार यायला पाहिजे त्यासाठी महिलांनी संघटीत व्हावे , आपण कधी पक्षाला महत्व दिले नाही मात्र विकासासाठी ​सत्तेचा वापर केला ,आता यापुढे आजीवन आपण भाजपशी प्रामाणिक असणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी दिली .

पेडणे मतदारसंघ भाजपा महिला मोर्चा समितीची निवड केल्यानंतर १८ रोजी पेडणे शा​सकीय विश्रामधाम येथे आयोजित महिला मोर्चाच्या बैठकीत ते बोलत होते​. ​ पेडणे भाजपा महिला मोर्चा अध्यक्षपदी निकिता तोरस्कर सरचिटणीस देविका सातार्डेकर यांची निवड बिनविरोध करण्यात आली .

 

यावेळी व्यासपीठावर गोवा प्रदेश महिला सरचिटणीस शिल्पा नाईक, उपाध्यक्षा नयनी शेटगावकर ,पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस , सरचिटणीस तथा पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर , हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलाशावकर ,तोरसे जिल्हा सदस्य सीमा खडपे , धारगळ जिल्हा सदस्य मनोहर धारगळकर , नगरसेविका तृप्ती सावळ देसाई , कोरगाव माजी सरपंच सिद्धी शेट्ये , कोरगाव सरपंच उमा साळगावकर ,  वझरी सरपंच करुणा नाईक , पोरस्कडे सरपंच ग्रेन्सी परेरा  ,चांदेल सरपंच संतोष मळीक ,कोरगाव माजी सरपंच प्रमिला देसाई ,आदी उपस्थित होते .

 

आश्वासन दिले नाही :
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना आपण धारगळ मतदार संघात १९९९ साली प्रवेश केला , त्यावेळी आपण त्या निवडणुकीत कुणालाच आश्वासन दिले नाही .आपल्याला एक संधी द्या आणि काम करून घ्या असे सांगितले होते आणि लोकांनी निवडून दिले .

विकासासाठी सरकार हवे :
​मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ताकद हवी. आणि ताकद आपण सत्तेत जाऊन घेतली. आणि कामाला गती दिली. कामांची गती वाढवली कारण सरकार तीन तीन महिन्याने कोसळत होते ,आपल्याला भीती होती त्यानंतर मिळेल त्या सरकारात केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी संधी घेतली, असे मंत्री आजगावकर म्हणाले .

आपण कधी सरकार पाडले नाही :
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले कि आपण कधी कुणाचेच सरकार पाडले नाही उलट सरकार बनव​​ले आणि विकासाला संधी दिली असा दावा मंत्री आजगावकर यांनी केला .

याही पुढे भाजपचेच सरकार : शिल्पा नाईक

गोवा प्रदेश भाजपा महिला सरचिटणीस शिल्पा नाईक यांनी बोलताना याही पुढे भाजपाचेच  सरकार सत्येवर येणार आहे आणि त्यासाठी महिला शक्तीचा मोठा सिहाचा वाटा उचलणार आहे , भाजपची महिला शक्ती प्रामाणिक कार्य करत आहेत . हि निवडणुकी तशी सोपी नाही याचे भान ठेवून महिलांनी काम करावे. शिल्पा नाईक यांनी बोलताना भाजपा हा एकमेव पक्ष होता जो कोरोना काळात फिल्डवर होता , जनता घरात बसून होती तर भाजपचे कार्यकर्त्ये घरी न राहता कोरोना काळात मदत करण्यासाठी रस्त्यावर होती , जीवाची पर्वा न करता कार्य केले .

 

शिल्पा नाईक यांनी सांगितले भाजपा हा एकमेव पक्ष आहे तो वर्षभर जनसंपर्कात असतो , तो केवळ निवडणुकीच्या काळात जनतेकडे येत नसून वर्षाचे १२ हि महिने तो जनतेला विविध  कामाच्या रूपाने संपर्कात येतो असे सांगितले .

भाजपच्या झाडाला आता फळे लागली : सिद्धी शेट्ये
कोरगाव माजी सरपंच सिद्धी शेट्ये यांनी बोलताना आम्ही सर्वांनी मिळून पेडणे मतदार संघात भाजपचे रोपटे लावले त्याचे वटवृक्षात रुपांतर होवून त्याला सुमधुर फळे लागलेली आहेत ती फळे चाखण्यासाठी सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी संघटीत होवून परतही पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करायला हवे असे त्यांनी सांगितले .

महिला शक्ती वाढवूया ; उषा नागवेकर
पेडणे नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी बोलताना महिला शक्ती वाढवून आता भाजपचा विस्तार करण्यासाठी पुन्हा एकदा बाबू आजगावकर याना विजयी करण्याची गरज आहे , आणि हे काम महिलाच करू शकतात असे तिने सांगितले .

महिलाना न्याय देणारा पक्ष ; सीमा खडपे
तोरसे जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे यांनी बोलताना १९९९ साली बाबू आजगावकर धारगळ मतदार संघाचे आमदार मंत्री झाले त्यावेळी मतदार संघात अनेक स्त्रियाही सरपंच झाल्या . बाबू आजगावकर यांनी प्रत्येक महिलेला व्यासपीठ उपलब्ध करून बोलण्याचे धाडस दिले , स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजना राबवल्या त्याचा आजही महिला लाभ घेवून काम करत असल्याचे सांगितले .

महिला मोर्चा उत्तर गोवा उपाध्यक्ष नयनी शेटगावकर यांनी बोलताना भाजपची शक्ती परत एकदा वाढवण्यासाठी पेडणे मतदार संघातून बाबू आजगावकर याना निवडून आणण्यासाठी संघटीत होवुया असे आवाहन केले .

नगरसेविका तृप्ती सावळ देसाई यांनी बोलताना पेडणे मतदार संघातील महिला जागृत आहे , आणि त्या महिलाना सतत भाजपा हाच एकमेव पक्ष प्रोत्साहन देत असतात .आजची महिला कुठेच मागे नसल्याचे तिने सांगितले .

पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावास यांनी बोलताना महिला शिवाय सरकार सत्येवर येवूच शकत नाही , महिलाना प्रोत्साहन देताना त्याच्या समस्या आणि आणि त्यांचा मानसन्मान एकमेव भाजपा पक्षच करू शकतो . येत्या निवडणुकीत महिलांनाच संघटीत होवून काम करावे लागेल असे सांगितले .

मुख्याध्यापक सुभाष सावंत यांनी बोलताना ज्या कुणाला मंत्री आजगावकर यांचा विकास दिसत नसेल तर त्यांनी पूर्ण मतदार संघाचा परत एकदा दौरा करावा , आणि विकासाची व्याख्या काय हेही जाणून घ्यावे , एखाद्या झोपडीला दोन पत्रे घातले म्हणून घर बांधून दिले असे होत नाही , किंवा दोन ट्रक माती घातली म्हणूनही रस्ता होत नाही . असे ते म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: