सातारा 

‘आरोग्यकेंद्र आहे, रुग्णवाहिका आहेत, पण कर्मचारीच नाहीत’

साताऱ्यातील जावली परिसरातील नागरिकांची व्यथा

मेढा ​(प्रतिनिधी) :​

सातारा जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे ​यांच्या माध्यमातून  दुर्गम जावलीतील सर्वसामान्यांच्या आरोग्य सुविधांची दखल घे​त  रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लागला. असे असले तरी, जावली तालुक्यांतील दुर्गम व डोंगराळ प्रदेशातील ५ प्राथमिक केंद्रांवर व 24 उपकेंद्रावर मंजुर १६० पदांपैकी ५३ पदे रिक्त असल्यामुळे जावलीची आरोग्यसेवा कोरोनाकाळात खिळखिळी ​झाली आहे. परिणामतः सर्वसामान्य नागरीकांना आरोग्यसेवेकरीता शहरात जाण्याशिवाय पर्याय ​नाही. जावलीत आरोग्य सेवा ​अपुऱ्या कर्मचाऱ्यांची वाणवा कधी संपणार असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. 

दुर्गम व डोंगराळ जावलीत आरोग्य कर्मचा​ऱ्यांचा तुटवडा हि प्रशासनाची डोकेदुखी झाली आहे. ​पावसाळा सुरु झाल्यामुळे साथ रोग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ​अशावेळी ​अपुरे मनुष्यबळ​ हे  जावलीतील साथरोग वाढी​चे महत्वा​चे कारण ​होण्याची भीती व्यक्त होत आहे. जावलीत आरोग्यसेवेमध्ये उपकरणाचा व वाहतुकीच्या साध​नांचा प्रश्न जेवढ्या प्रमाणात सुटला आहे​. त्यापेक्षा जावलीतील दुर्गम व डोंगराळ जनतेला आरोग्य सेवा पुरवण्यात कर्मचार्याचा प्रश्न आजपर्यंत सर्वात जटील होवुन बसला आहे . जावली तालुक्याने जिल्ह्यांच्या जिल्हापरीषदवर दोन वेळा नेत्तृत्व करुन देखील आरोग्य सेवेतील कर्मचार्याचा ​तुटवडा मात्र संपवता आला न​सल्याचे समोर आले आहे. 

जावलीचे ​नेतृत्व करणारे आमदार शिवेंद्रराजे भोसले यां​चे प्रशासनात ​चांगले वजन आहे. ​असे असतानाही शिवेंद्रराजेना जावलीच्या आरोग्यसेवेचा प्रश्न मार्गी लावण्यात अपयश ​आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य नागरीकांना आरोग्याची मुलभुत सुविधा​ पोचवण्यासाठी शिवेंद्रराजेंनी पुढाकार घ्यावा आणि आरोग्यकेंद्रात आवश्यक ते मनुष्यबळ त्वरित पुरवावे अशी आग्रही मागणी होत आहे. 

जावली तालुक्यांतील आरोग्य विभागातील  रिक्तप​दे भरावी ही आग्रही मागणी आहे. कोरोना काळात अपुर्या आरोग्य कर्मचार्यानमुळे आरोग्य विभागाची पळापळ झाली आहे . जावली तालुक्याला आरोग्य कर्मचारी पुर्ण क्षमतेने भरल्यास  आरोग्य सेवेची कोरोनाकाळात झालेली ससेहोलपट नक्कीच थांबेल​. 

भगवान ​मोहिते, 
जावली तालुका आरोग्य अधिकारी
shivendrarajeराज्याचे आरोग्य ​मंत्री राजेश टोपे याच्याकडे जावली तालुक्यांतील आरोग्य विभागातील ​रिक्तपदाकरीता आमदार म्हणुन माझा पाठपुरावा सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमत्री अजित पवार याच्याकडे जावली तालुक्यातील आरोग्य विभागातील  रिक्तपदे ​भरण्याकरीता मागणी केली आहे . राज्यामध्ये ​लवकरच होणा​ऱ्या  आरोग्य सेवेतील कर्मचार्याच्या भर्तीनतंर जावली तालुक्यांतील आरोग्य सेवक व वैद्यकीय अधिकारी यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार​. ​
​- ​शिवेंद्रराजे भोसले​,​
​आमदार, सातारा जावली विधानसभा मतदारसंघ​. 
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: