गोवा 

‘विकासामध्ये पत्रकारांचा हातभार मोठा’

पेडणे  (प्रतिनिधी) :
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता पेडणे तालुक्यातील पत्रकारांनी आपले कार्य अखंडित चालू ठेवले. दररोज कोरोनाविषयी वृत्त सविस्तर देणे , आरोग्याच्या समस्या कोरोना सेंटरचा पाठपुरावा करत असतानाच लोकप्रतिनिधी चुकत असेल तर त्याठिकाणी आवाज उठवणे ,समस्या सरकारच्या निदर्शनात आणत असताना मांद्रे मतदार संघाच्या विकासालाही मोठा हातभार असल्याचे प्रतिपादन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी मांद्रे भाजपा तर्फे पेडणे तालुक्यातील पत्रकारांचा गौरव केल्यानंतर केले.

मांद्रे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मांद्रे मतदार संघ भाजपा निरीक्षक गोरख मांद्रेकर उपस्थित होते.

यावेळी निवृत्ती शिरोडकर , विठोबा बगळी ,मकबूल माळगीमणी ,चंद्रहास दाभोलकर , राजेश परब , जयेश नाईक ,विनोद मेथर , संदीप कामुलकर , प्रसाद पोळजी , अस्मिता पोळजी आदींचा शाल श्रीफळ पुष्प व भेटवस्तू देवून गौरव केला .

यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळ चेअरमेन तथा आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना , आगरकर टिळक पासून सुरु असलेली पत्रकारिता आजही ग्रामीण भागातील पत्रकार अल्प मानधन घेवून काम करतात , त्यांच्या समस्या अडचणी आजपर्यंत कुणीच समजून घेत नाही , त्यांचे त्याना अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो . असे सांगून , पेडणेतील सर्व पत्रकार जागृत  असल्याने विकासालाही गती मिळते असे सांगितले . पत्रकार अविरत कार्य करीत असल्याचे दाखल  घेवून भाजपा ने त्यांचा गौरव आयोजित केला आणि त्याला मान्यता दिल्याने पत्रकारांचे अभिनंदन केले .

सविस्तर निपक्ष वृत्त देणारे पत्रकार : गोरख मांद्रेकर
मांद्रे मतदारसंघातील पत्रकार किती जागृत आहेत हे सकाळी कोणतेही वर्तमान पत्र उघडले कि लक्षात येते , निपक्ष वृतांकन तेही सविस्तर वाचायला याच मतदार संघातील पत्रकारांचे वाचायला मिळते ,जसे आजपर्यंत पत्रकारांनी सहकार्य केले तेही यापुढे अपेक्षित आहेत ,असे मांद्रेकर म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: