गोवा 

पेडण्यात मजुरांचे लोंढे दाखल, परत कोरोनाची भीती

पेडणे ​(निवृत्ती शिरोडकर​)​ :

१९ रोजी पेडणे रेल्वे स्थानकावर आलेल्या रेल्वेतून शेकडो मजुरांचे ​लोंढे पेडणेत दाखल झाले​. ​ स्थानकावर सकाळी  साडेसात​ ​वाजता पटना​, बिहार येथून ​ट्रेन ​आली​.  त्यातून आलेल्या मजुरांची कोणतीच तपासणी केली नाही​.  त्यांनी कोरोनाचे दोन डोस घेतले कि नाही , किंवा त्यांच्याकडे निगेटिव्ह सर्टिफिकेट आहे कि नाही यांची तपासणी केली नाही. त्यामुळे कोरोनाची भीती तालुक्यात व्यक्त होत आहे.

एका बाजूने पत्रादेवी चेक नाक्यावरून येणाऱ्याना दोन्ही डोस घेतले कि ​​नाही , किंवा कोरोना नेगेटिव्ह सर्टिफिकेट असेल तरच प्रवेश दिला जातो , नाक्यावर कडक तपासणी चालू असतानाच दुसरीकडून रेल्वे मार्गातून येणाऱ्याची कोणीही तपासणी करत नाही त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

रेल्वेतून १९ रोजी मोठ्या प्रमाणात मजुरांनी पेडणेत प्रवेश केला . सध्या कोरोनाचा काळ असल्याने नागरिकामध्ये चितेचे वातावरण पसरले आहे .एका बाजूने कर्फ्युचे तीन तेरा वाजवले जातात तर दुसऱ्या बाजूने मजुरांचे लोढे आले , त्यांची कोणी तपासणी करत नाही.

हे मजूर रेती व्यवसायासाठी, रस्ते इमारती बांधकाम करण्यासाठी आले आहेत. त्यांच्याकडे कोरोनाचे डोस घेतले कि नाही, याची तपासणी कोण करणार? त्यांच्याकडे आरोग्य कार्ड आहे कि नाही याची आता आरोग्य निरीक्षकांनी शापोरा आणि तेरेखोल नदी किनारी ज्या रेती व्यावसायीकांच्या होड्या झोपड्या आहेत त्या ठिकाणी जावून तपासणी करावी लागेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: