गोवा देश-विदेश

गोकर्ण मठाधिश श्रीमद विद्याधिराज स्वामींचे महानिर्वाण

मडगाव :
श्री गोकर्ण – पर्तगाळ मठाचे मठाधिश श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामींचे (76) आज दुपारी महानिर्वाण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालविली. गोवा, कर्णाटक आणि महाराष्ट्रात विखुरलेल्या त्यांच्या अनुयायी साठी ही धक्कादायक बातमी होती. त्यांच्या निधनावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत  यांनी शोक व्यक्त केला आहे.

गोवा,केरळ, महाराष्ट्र या राज्याबरोबरच अन्य राज्यात मोठ्या प्रमाणात शिष्य व अनुयायी आहेत. ही वार्ता समजल्यानंतर मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपें तातडीने पर्तगाळाला येण्यास पणजीहून निघाल्याचे त्याच्या काणकोण मधील अनुयायांनी सांगितले.त्याच्या महानिर्वाणावेळी त्याचे शिष्य स्वामी विद्याधिश त्याच्या सोबत होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: