मुंबई 

संजय राऊत यांचे कौतुक करावे तेवढे कमीच : चित्रा वाघ 

मुंबई (अभयकुमार देशमुख) :

रविवारी संजय राऊत यांना शालजोडीतील दिल्यानंतर आज पुन्हा एकदा भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना धारेवर धरले आहे.

मुंबईच्या पावसासंदर्भात आज एक व्हिडीओ पोस्ट केला, या व्हिडीओमध्ये त्यांनी मुंबईतील पाऊस, दरड कोसळण्यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर उपरोधिक टीका केली.

 
काय म्हणाल्या चित्रा वाघ :
 


संजय राऊत यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे कारण त्यांनी पावसामुळे दरडी कोसळून मृत पावलेल्या मुंबईकरांसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरलं नाही..

पण मुंबईत गेलेले एकूण ३० बळी ‘अनैसर्गिक पावसाने’ नाही तर अनैसर्गिक आघाडीच्या कृतीशुन्यतेमुळं गेलेत.

मुंबईतल्या डोंगर आणि टेकड्यांबद्दल राऊतांना आज आग्रलेखात पाझर फुटत असला तरी त्याच झोपडपट्टीवाल्यांच्या पुनवर्सनासाठी शिवसेनेनं वितभर जागा देण्याचही धारिष्ठ्य दाखवलं नाही.

२० वर्षात २०० हून अधिक नागरिकांचा दरड दुर्घटनेत जीव गेल्याची कबुली स्वतः राऊतांनी दिलीये परंतू त्या झोपडपट्ट्यांच्या पुनवर्सनाला शिवसेना तयार नाहीत. नियोजन शुन्यता आणि कॉंट्रॅक्टर बिल्डर्सच्या घरभरु धोरणांच बील आता राऊत पाऊसावर फाडत आहेत.

अनैसर्गिक पवासाच्या पदरा आड दडून मुंबई मनपा कशी नामानिराळी आहे हे सिद्ध करण्यात राऊत व्यस्त आहेत.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: