सातारा 

शशिकांत शिंदे म्हणताहेत, ‘दुआ में याद रखना’

मेढा (प्रतिनिधी):

कुडाळ शहरातील मुस्लीम समाजाचा सेवक म्हणुन सदैव सर्वेोतपरी मदत केली आहे. मुस्लीम समाजाच्या अडचणी सोडवण्याकरीता लागणारी मदत देत असताना, मुस्लीम बाधवांची दुआ पाठीशी राहुद्या विकास कामात मागे नाही पडणार असे भावनात्मक आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी कुडाळ येथील मुस्लीम समाजाच्या दफनभुमीच्या वेटींग शेडच्या भुमीपुजन करताना भावना व्यक्त केला.

यावेळी ते म्हणाले राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक विभागाकडुन मुस्लीम समाजाच्या विकासाकरीता भरीव निधी आणण्याकरीता आजपर्यंत प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. यापुढे देखील कुडाळ शहरासह जावलीतील मुस्लीम समाजाने प्रश्न आग्रही मार्गी लावणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुडाळ शहरातील मुस्लीम बाधवानी माझ्या राजकीय जडणघडणीत मोलाची भूमीका पार पाडली आहे.  कुडाळ शहरातील मुस्लीम बाधवाची दुआ सदैव बरोबर असल्यामुळे आजही जावलीचा सुपुत्र सर्वसामान्यांच्या विकासाकरीता कटीबद्ध आहे. जावली तालुक्यांतील मुस्लीम समाजाच्या अडचणी सोडवण माझे कर्तव्य आहे . आगामी काळात राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाकडुन लागेल ती मदत कुडाळसह जावली तालुक्यांतील मुस्लीम समाजाकरीता कटीबद्ध आहे अशी भुमीका यावेळी व्यक्त केली .

यावेळी ग्रा.प.सदस्य संजूकाका शिंदे,मा.ग्रा.उपसरपंच समीरभाई डांगे  कुंभार,दादा रासकर,हेमंत शिंदे,हुमगावचे बुवासाहेब पिसाळ,कुडाळ ग्रा.प.उपसरपंच सोमनाथ कदम,कुडाळ गावातील नागरिक तसेच मुस्लिम समाजातील नागरिक तेथे उपस्थितीत होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: