गोवा 

पर्यटकांना लुटणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांना अटक

पेडणे (प्रतिनिधी) :
येथील पोलिसांनी आंतरराज्य चोरट्या टोळीतील दीपेंद्र सिंग , प्रल्हाद सोनी , अन्जालीका मुकेश जैस्वाल व बिकी बारीक याना अटक केली.

पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहिती नुसार १८ रोजी अजितकुमार चेन्नाई या २२ वर्षीय युवकाने पेडणे पोलिसाना तक्रार दिली कि दाभोळी विमानतळावर दोन अज्ञात पुरुष व दोन व महिला यांचा संपर्कात आल्या आणि कारमध्ये लिफ्ट दिली व आपल्याला फोंडा येथे एका हॉटेलात सोडले .व त्यानंतर पेडणे येथे सोडण्यात आले  तिथ त्याना डोक्यावर मुठ मारून त्यांचे रोख २००० हजार घेतले व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग हिसकावून घेतली. संशियिताने त्याला जिवंत मारण्याची धमकी देत एटीएम मधून २२००० हजार काढून घेतले.

तक्रारीची गंभीर दखल घेवून पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या नैतृत्वाखाली विविध पथके तयार केली. आणि सूत्रे फिरू लागली . गुन्हा नोंद झाल्यानंतर ताबडतोब संशीताने वापरलेली पांढरी कार शोध घेण्याची मोहीम सुरु केली .त्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार करण्यात आली . व्यापक तांत्रिक पाळत ठेवून  आणि मानवी बुद्धिमत्तेद्वारे कारची ओळख पटविण्यात आली . हि कार कलंगुट येथे असल्याची माहिती मिळाली .जिवबा दळवी यांच्या नेतृत्वात टीम कलंगुट येथे दाखल झाली आणि जी.ए.-11-ए 5222 नंबर असलेली व्हाइट कलर स्विफ्ट कारसह संशईत दीपेंद्र सिंह, एस / ओ, सुरेश प्रसाद,  २० वर्ष आर. ओ. माझियारी, मध्य प्रदेश. ताब्यात घेण्यात आले.

चौकशी दरम्यान दीपेंद्रसिंग यांनी ज्योति प्रल्हाद सोनी, अंजिलिका मुकेश जैस्वाल आणि एक बिकी बारिक अशी या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर सहकारी / सहकारी आरोपींची नावे उघड केली. त्यानंतर सर्व आरोपींना पेडणे पोलिसांनी भारतीय दंड संहिता ३९२ , ३९४ ३२३ ५०६९ [ २ ] r /w ३४ नुसार गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.

तपासणी दरम्यान पेडणे  पोलिसांनी या टोळीचा  एक संशयित व्यक्ती हॉटेल बुकिंग करण्यासाठी मोबाईल नंबर वापरत होतो. अधिक तपास करता तो नंबर पोलिसांच्या हाती लागला .

आरोपींकडून चोरी केली गेलेली फिर्यादीची कागदपत्र पोलिसांनी पोलिसांना यशस्वीरित्या जप्त केली. गुन्ह्यात वापरलेली गाडीही जप्त केली.

पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभू देसाई, पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जिवबा दळवी पुढील तपास करत आहे.

पोलीस निरीक्षक  जीवबा दळवी यांच्यासह उपनिरीक्षक  हरीश वैगणकर, उपनिरीक्षक  विवेक हलरणकर, उपनिरीक्षक  संजीत कांदोळकर, हेड कोस्टेबल  गुरुदास मांद्रेकर, , सागर खोर्जुवेकर, ,यशोदास उगवेकर  विनोद पेडणेकर, अर्जुन कलंगकर, राजन धरण, देवदास यांच्यासह तपास पथक   दीपा शेट्ये,  तृप्ती सातोडकर.आदींनी कामगिरी केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: