गोवा 

१२ वीच्या परीक्षेत कलमेश्वर विद्यालयाचे धवल यश

पेडणे (प्रतिनिधी) :
नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वी बोर्डाच्या परीक्षेत कोरगाव येथील श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयातून कला शाखेत कु.धनश्री प्रकाश नाईक ही विद्यार्थिनी ९४.६७ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली.तर वाणीज्य शाखेत कु. साईश प्रकाश हरमलकर ९२.६६ टक्के गुण मिळवून प्रथम आला.

या विद्यालयातून कला शाखेत ५८ तर वाणिज्य शाखेत ४५ विध्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला कला शाखेत विशेष प्राविण्य श्रेणीत १२,प्रथम श्रेणीत २४ तर द्वितीय श्रेणीत २२ विध्यार्थी उत्तीर्ण झाले.वाणिज्य शाखेत विशेष प्राविण्य श्रेणीत १९ ,द्वितीय श्रेणीत १६ विध्यार्थी उत्तीर्ण  झाले.

कला शाखेतून कुमारी प्राची प्रशांत गावडे  ८९.३३ टक्के मिळवून द्वितीय ,कुमारी सायली संदीप कांबळी ८९ टक्के तृतीय ,कुमारी श्रुती दयानंद गवंडी ८८.५० टक्के चौथी, व कुमारी दुर्वा रामफोंडू गावस ८६.३३ टक्के मिळवून पाचवी आली.

वाणिज्य शाखेत कुमार विष्मय उमेश गडेकर ८७ टक्के द्वितीय,कुमार झिमु जानू बुटे ८६.६६ टक्के तृतीय ,कुमारी नेहा नारायण मावलणकर ८६ टक्के चतुर्थ व कुमार स्वप्नील सचिन कवठणकर ८५.१६ टक्के मिळवून पाचवा आला.

विद्यालयाने आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखल्याबद्दल श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन परशुराम गावडे,पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष मिलिंद तळकर  प्राचार्य सुदन बर्वे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: