गोवा 

दिल्लीच्या वीजमंत्र्यांनीही स्वीकारले काब्राल यांचे आव्हान

पणजी :
केजरीवाल मॉडेलच्या यशापयशावर अखेर गोव्यात वादविवाद पाहायला मिळेल! निलेश काब्राल यांच्या गोलपोस्ट मध्ये सतत बदल करण्याच्या कृतीनंतर आता दिल्लीच्या उर्जामंत्र्यांना हवे असलेली बाब झाली आहे, दिल्लीचे उर्जामंत्री सत्यंदर जैन रविवारी त्यांच्याशी वादविवाद करण्यासाठी गोव्यात  येणार आहेत.

‘कराचा पैसा कशासाठी- सत्ता विकत घेण्यासाठी की जनतेला मोफत वीज पुरवण्यासाठी’ हा चर्चेचा विषय आहे. भूतकाळात केजरीवाल मॉडेल संदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे निलेश काब्राल नीटपणे देऊ शकलेले नाहीत, हे देखील याठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे.त्यांचे पहिले आव्हान ‘आप’ चे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्ढा यांनी स्वीकारले होते, परंतु राघव चड्ढा दिल्लीला रवाना झाल्यावर ऊर्जामंत्री निलेश काब्राल बिळातून बाहेर पडले होते. ह्यावेळेस काब्राल यांनी आव्हान दिल्यानंतर प्रोटोकॉलचे कारण सांगून चड्ढा यांच्यापासून लपून बसले आणि दिल्लीचे ऊर्जामंत्री यांना भेटण्याची मागणी केली. आपच्या ऊर्जामंत्र्यांनी काब्राल यांचे आव्हान मान्य केल्यामुळे त्यांच्याकडे लपून राहण्यासाठी कोणतेही संयुक्तीक कारण आता उरलेले नाही आणि आपल्या अयशस्वी धोरणांच्या बचावासाठी श्री काब्राल यांना टीव्हीवर येण्यासाठी आता भाग पडले आहे.

राघव चड्ढा यांनी काब्राल यांच्याशी संवाद करण्याचे आव्हान स्वीकारताच, त्यातून पळ काढणाऱ्या काब्राल यांचे आव्हान सत्येंद्र जैन यांनी स्वीकारत गोव्याचे ऊर्जामंत्री निलेश काब्राल यांच्या ताज्या यू टर्नला प्रतिसाद दिला होता.

“निलेश बाब, मला असे समजले की आपच्या 24×7 मोफत वीजेच्या घोषणेवर आपण दिल्लीच्या उर्जामंत्री यांच्याशी चर्चा करू इच्छित आहात. मी आपले आव्हान स्वीकारतो. मी या रविवारी गोव्यात असणार आहे. मला आशा आहे की, रविवारी दुपारी 3 वाजेची वेळ  तुमच्या दृष्टीने बरोबर आहे. आपचे उर्जामंत्री संतेन्द्र जैन म्हणाले की, “आपली नक्की भेट घेईन”.”निलेश बाब, तुम्हाला समजलेच असेल की, आमचे उर्जा मंत्री तुमच्याशी चर्चा करण्यासाठी रविवारी गोव्यात असतील. कृपया या वेळी पळून जाऊ नका.सामना करा, ” आपचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव यांनी ट्विट केले. रविवारीच्या चर्चेचा विषय आहे –  “सार्वजनिक पैशाचा वापर आमदार खरेदी करण्यासाठी केला पाहिजे की, जनतेला मोफत वीज देण्यासाठी?” गोमंतकीयांना  काय हवे आहे?

आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की, आम आदमी पार्टी राज्यात 300 युनिट पर्यंत वीज देईल व 24×7 वीजपुरवठा सुनिश्चित करेल. या धोरणामुळे गोव्यातील 87% लोकांना शून्य वीज बिल मिळतील, ज्याची एक आवृत्ती दिल्लीत आधीच कार्यरत आहे. गोवा वीज निर्माण करणारे राज्य असूनही गोमंतकीयाना  24×7 मोफत वीज का पुरविणे शक्य झाले नाही, ह्या प्रश्नांना काब्राल पुन्हा एकदा जनतेसमोर  भिडणार आहेत.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: