सातारा 

नागठाणेमध्ये महिलेचा खून

नागठाणे (प्रतिनिधी) :

नागठाणे (ता.सातारा) येथे एका महिलेचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मालन बबन गायकवाड (वय 55, रा.नागठाणे, ता.सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

नागठाणे येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळेसमोर असणाऱ्या चाळीतील एका खोलीत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबीकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सुचना दिल्या. घटनास्थळी ठसे तज्ञांना पाचारण केले आहे. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे. ऐन आषाढी एकादशी दिवशीच खुनाची घटना उघडकीस आल्याने नागठाणे गावात एकच खळबळ उडाली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: