गोवा 

मोफत वायफायवरून मांद्रेत राजकारण सुरु

पेडणे (प्रतिनिधी) :
मान्द्रे पंचायत क्षेत्रातील गरजवंत विद्यार्थ्यांना २४ तास व्हायफाय इन्टरनेट सेवा मगोचे जीत आरोलकर यांनी मोफत ​व्हायफाय ​१९ रोजी सुरु केली होती​,​ ​दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून ​हे ​केबल कापून टाकल्या​बद्दल  ​घटनेचा निषेध केला ​असून, ​शा घाणेरड्या प्रकाराला थारा दिला जाणार नाही ​असे सांगतानाच, आमदार दयानंद सोपटे यांनी आपल्या भाषेला नियंत्रणात आणावे ,हा प्रकार मगो पक्ष कदापही सहन करणार नाही असा इशारा मगो पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य आणि मांद्रेचे माजी सरपंच ,विद्यमान पंच राघोबा गावडे यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना दिला .

सध्या कोरोनाचा कठीण काळ आहे आणि बाहेर जोरदार पाऊस सुरु असतानाच आमदार सोपटे आणि जीत आरोलकर या दोन्ही नेत्यामध्ये शाब्दिक वणवा पेट घेत आहे. व्हायफाय इन्टरनेट या सेवेचा मुद्दा घेवून सध्या मतदारसंघात राजकीय युद्ध मोठ्या प्रमाणात चालू आहे .

मगोचे नेते जीत आरोलकर यांनी १९ रोजी सर्वात प्रथम मांद्रे पंचायत सभागृहात मांद्रे पंचायत क्षेत्रातील ​विद्यार्थ्यांना २४ तास मो​​फत व्हायफाय सेवा सुरु केली .आणि इन्टरनेट केबल सेवा  देण्याचे कंत्राट स्थानिक भूमिपुत्रालाच दिले. त्याच्या दुसऱ्या दिवशी २० रोजी आमदार दयानंद सोपटे यांनी पार्से पंचायत क्षेत्रातील गरजू ​विद्यार्थाना पंचायत सभागृहात दिवसाचे दोन तास इन्टरनेट मोफत सेवेचा शुभारंभ केला ,आणि त्याचे कंत्राट तालुक्याबाहेरच्या ​व्यावसायिकाला दिले. या दोन विषयावरून सध्या दोघांमध्ये बरेच वाद सुरु आहेत .

​दरम्यान, ​जीत आरोलकर यांनी मांद्रेमध्ये चालू केलेल्या व्हायफायचे सर्व केबल भाऊसाहेब बांदोडकर पुतळ्याजव​ळ कुणीतरी कापून टाकले​,​ त्या घटनेचा माजी सरपंच राघोबा गावडे यांनी निषेध केला​. ​

माजी सरपंच राघोबा गावडे यांनी माहिती देताना १९ रोजी गरजू विधार्थ्यांची गरज लक्षात घेवून सर्वात प्रथम व्हायफाय सुरु केली , त्यावेळी जीत आरोलकर यांनी आपल्या भाषणात हि सुविधा सरकारने सुरु करायला हवी होती असा उल्लेख केला​.  त्यांनी आमदार सोपटे यांच्या नावाचा​ ​उल्लेख सुद्धा न करता किंवा आमदार सोपटे यांच्यावर टीकाही न करता आमदार सोपटे यांनी पार्से येथे आपल्या कार्यक्रमात जीत आरोलकर यांच्यावर खालच्या पातळीवर जावून टीका केली आ​हे,  ती अयोग्य आहे​. त्याविषयी सर्वत्र ​व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जनतेची दिशाभूल करून आमदार सोपटे यांनी भलतीच वक्तव्य करू नये असे आवाहन राघोबा गावडे यांनी दिले आहे .

​​मग आमदार प्रसिद्धी घेत नाही का ?
आमदार सोपटे यांच्या म्हणण्यानुसार ते कधीही मताची गणिते करत नाही का , ज्या योजना लोकाना मिळवून देतात त्यावेळी ते किंवा त्याचे जे समर्थक व्यासपीठावर असतात तेव्हा भाषण देताना आमदार सोपटे याना परत संधी द्यावी व भरघोस मतांनी विजयी करावे अ​से का सांगितले जाते? ती मतांची गणिते नव्हे का​? ​ जीत आरोलकर यांनी २४ तास इन्टरनेट सेवा सुरु केली त्यासाठी ​प्रसारमाध्यमांना निमंत्रित केले . त्याची माहिती लोकापर्यत पोचावी म्हणून,​ ​तर मग आमदार सोपटे यांनी २ तासासाठी इन्टरनेट सेवा कार्यरत केली तेव्हा प्रसारध्यामाना बोलावून प्रसिद्धी केली नाही का​? ​असा प्रश्न राघोबा गावडे यांनी उपस्थित केला .

आमदार सोपटे यांचा सध्या तोल ढासळल्यासारखे बोलत आहे​त​. सोपटे यांनी मगो पक्षाच्या नेत्यावर विनाकारण टीका करू नये​. आमदारांनी पूर्ण मतदारसंघात ​जाऊन रस्त्याची, वीज पाणी याची काय स्थिती आहे ती पहावी व ती सोडवण्याचा प्रयत्न करावा​. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर त्यांनी राजकारण करू नये​. ​बेकायदा रस्ते फोडणाऱ्याना ​पाठिंबा देणाऱ्या आमदाराकडून आणखी काय अपेक्षा ठेवावी​?​ असा प्रश्न उपस्थित करून जो कोणी गरजवंतला मदत करतात त्यांचे  स्वागत अभिनंदन करण्याऐवजी त्यांच्यावर टीका करणे हे आमदार सोपटे ​याना शोभत नाही​,​​सेही गावडे यांनी ​यावेळी नमूद केले. 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: