गोवा 

मांद्रेत आपचे कार्य गतिमान : शहापूरकर 

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
मांद्रे मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे कार्य गतिमान होत असून विविध उपक्रमाद्वारे सर्वसामान्य नागरिक पक्षाकडे जोडला जात आहे . अशी माहिती , मांद्रेचे आम आदमी पक्षाचे नेते वकील प्रसाद शहापूरकर यांनी पत्रकारांकडे बोलताना सांगितले .

शहापूरकर यांनी पुढे बोलताना सांगितले कि जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे उमेदवार दिला होता. पक्षाच्या सक्रीय कार्य त्यागोदर एक महिना सुरु झाले होते . प्रचाराला वेळ कमी मिळाला ,पक्ष बांधणी मतदा संघात सुरु झाली नव्हती. तरीसुद्धा पक्षाची धोरण तळागाळात वावरणारा सुशिक्षित व संवेदनशील व चारित्र्यवान अश्या प्रसाद शहापूरकर याना उमेदवारी देवून निवडणुकीत आव्हान उभे केले होते.

जिल्हा पंचायत निवडणुकीत प्रसाद शहापूरकर यांनी आठशे मते घेवून इतर राजकीय पक्षाचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले होते . एक खंबी प्रचारातून एवढी मते मिळवल्याबद्दल आम पार्टी व त्यांचे नेते शहापूरकर यांचे अस्तित्व दिसून आले . या निकालानंतर पक्षाने आपले कार्य अधिक जोमाने सुरु केले . कोविड्च्या काळात ओक्सिमिटर ,वाहनसेवा अत्यावश्यक सेवा देण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला

वीज आंदोलन द्वारे गावात बैठका घेतल्या ,रेशन सेवा सुरु केली तुये , हरमल पालये ,  , मांद्रे गावातील ,काही प्रभागात पूर्ण केले आहे . तर हि सेवा सर्वापर्यंत पोचवण्यासाठी धडपड आहे . नागरिकाना अर्ज लिहून देणे , सरकारी कार्यालयात त्यांच्यासोबत जावून प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करणे अशी कामे हाती घेतली आहे .

प्रत्येक गावात बूथ समिती ग्राम समिती ,काढण्याचा कामास प्रारंभ झाला आहे .मांद्रे मतदार संघात हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या काही कार्यकर्त्याना घेवून पक्षाचे कार्य सुरु केले . त्या पक्षाकडे एक वर्षाच्या आत सेवाभावी कार्य कर्त्याची फळी निर्माण झाली आहे व अनेकजण आम पार्टीचे सदस्य होण्यासाठी पुढे येत आहेत अशी माहिती पक्षाचे नेते प्रसाद शहापूरकर यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: