गोवा 

मान्द्रेतील रस्त्यांची चाळण, सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे दुर्लक्ष

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
तालुक्यातील जशा राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली आहे .त्याच पद्धतीने मांद्रे मतदारसंघातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्याची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे आणि डांबरही उखडून गेले आहे. या रस्त्याकडे पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम रस्ताविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. निदान पेडणे तालुक्यातील रस्ता विभाग आहे कि नाही असा संशय निर्माण झाला आहे. कोणीही येतो केव्हाही मधोमध रस्ता खणला जातो, आणि खाते उघड्या डोळ्यांनी आपले ते कामच नाही असे वागत असतात, त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

रस्त्याची झालेली चाळण संबधित खात्याला कशी काय दिसत नाही , वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पडलेल्या खड्यातून एखाद्या व्यक्तीचा बळी हवा कि काय अशी वाट तर रस्ता विभाग पाहत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

झालेल्या रस्त्याच्या चाळणी विषयी स्थानिक आमदार दयानंद सोपटे आणि सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाकडे या विषयी विचारणा केली असता , आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितले कि अधिकाऱ्यांना सुचना केलेल्या आहेत. अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता पाऊसाचे निमित पुढे केले जाते.

या रस्त्याविषयी १४ मे रोजी अधिकाऱ्यांना माहिती दिली होती ,मात्र १५ ,१६ रोजी पाऊस जोरदार पडला , त्यानंतर विसावा घेतला होता , मात्र त्या काळात सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाने या रस्त्यांची दुरुस्ती केली नाही . परिणामी जून महिन्यात पावसाने आपला जोर कायम धरला आणि रस्त्याना पडलेल्या खड्ड्यांचा आकार वाढला गेला , किनारी भागातील रस्त्याची स्थिती भयानक आहे , त्यात आश्वे येथील किनारी भागातून जाणारा रस्ता त्याची स्थिती पहायला हवी होती. पडलेले खड्डे वारंवार आकाराने वाढत आहेत , या वरून वाहने चालवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे.

पाण्याचे नळ घेण्यासाठी काहीजणांनी रस्त्ये खणले ते व्यवस्थित बुजवले नसल्याने आता ते खड्डे मोठे झाले त्यावारुन वाहने चालवताना धक्के सोसावे लागतात कंबरडे मोडून जाते, अशी स्थिती आहे .

प्रज्योत नाईक यांनी प्रतिक्रिया देताना ,जर स्थानिक पंचायत , जिल्हा पंचायत आणि विधान सभेचे लोकप्रतिनिधी जागृत असेल तर कोणत्याही समस्या सहज सुटू शकतात , वाहनधारक रस्त्याचा कर भरत असतो त्याना व्यवस्थित रस्त्ये देण्याची सरकारची जबाबदारी असते . मात्र संबधित खाते दुर्लक्ष करीत असल्याने लहान असलेले खड्डे पावसाचे पाणी साचून आणि वाहनाचे धक्के बसून ते वाढत असतात , रस्ता विभागाने वेळीच जर लक्ष घातले असते तर हि दननीय स्थिती रस्त्यांची झाली नसती असे मत नाईक या वाहन चालकाने व्यक्त केले .

रस्त्याला एकही खड्डा नाही
याच मांद्रे मतदारसंघातील आगरवाडा जंक्शन ते पार्से व्हाया तुये पर्यतच्या रस्त्याला एकही खड्डा नाही. हा रस्ता माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मिकान्त पार्सेकर यांनी आणि त्या त्या गावातील स्थानिकांनी पुढाकार घेवून या रस्त्याचे रुंदीकरण केले , जसे पार्सेकर स्थानिकांकडे रस्त्याविषयी बोलत होते त्याच प्रमाणे स्थानिक नागरिकही रस्ता रुंद व्हावा म्हणून लोकांकडे चर्चा करून सर्वांच्या संमत्तीने रस्ता केला , त्या रस्त्याला एकही खड्डा नाही .

दरम्यान भरपावसात हल्लीच या रस्त्याचे रस्त्या खोदकाम करण्यासाठी परवानाही न घेता खोदकाम केले होते त्यावेळी गोवा फॉरवर्ड चे मांद्रे मतदार संघाचे जाहीर केलेले उमेदवार दीपक कलंगुटकर यांनी आवाज उठवला होता , खोदकाम रोखून धरल्यावर अधिकाऱ्यांना जाग आली , त्यानंतर खोदलेला रस्ता बुजवण्यात आला .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: