सातारा 

वेण्णाला पूर; हजारो पर्यटक अडकले

सातारा (महेश पवार) :
 वेण्णा नदीला पूर आल्याने हजार पर्यटक अडकले. बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस पडत असल्याने वेण्णा लेक ते बगीचा कॉर्नर परिसरात पाणी रस्त्यावर आले. यामुळे फिरायला आलेल्या पर्यटकांना पाण्यातून गाडी न्यायला घाबरत होते. यावेळी महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्सनी पर्यटकांना मार्ग काढून दिला. हे जवळपास दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत मदतकार्य चालू होते. पाऊस सतत चालू असल्याने महाबळेश्वर येथील विज पुरवठा बंद झाला आहे. पावसाची संततधार जर अशीच सुरू राहिली तर वाहनचालकांना धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
दरम्यान, जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज  मंगळवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 19.8  मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 119.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 23.3 (91.7) मि. मी., जावळी- 47(154.8) मि.मी., पाटण-35.0 (157.5) मि.मी., कराड-14.0(75.0) मि.मी., कोरेगाव-9.7 (84.7) मि.मी., खटाव-7.8 (46.0) मि.मी., माण- 3.6 (118.3) मि.मी., फलटण- 0.7 (65.4) मि.मी., खंडाळा- 2.7 (45.0) मि.मी., वाई-18.3 (120.4) मि.मी., महाबळेश्वर-85.6 (636.3) मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: