मुंबई 

मुख्यमंत्र्यांनी घेतला कोकणातील पूरपरिस्थीतीचा आढावा

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील पूरपरीस्थितीचा घेतला आढावा. रायगड, रत्नागिरी, सिधुदूर्ग चे जिल्हाधिकारी कोकण विभागीय आयुक्त, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, सिधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री आदीची तटकरे यांच्याशी केली चर्चा. तात्काळ आपतकालीन विभागाकडून सर्व मदत पोहचवण्याचे दिले आदेश. पूराने वेढलेल्या गावातील आणि शहरांतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हेलिकाँप्टरचीही मदत घेण्याचे आदेश. पूरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढन्यासाठी अतीरीक्त बोटी तात्काळ पोहवण्याचेही आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांना दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पूर परीस्थितीचा आढावा घेतला आहे. ठाणे आणि पालघर जिल्हाधिकारी तसेच ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून तात्काळ लागेल ती सर्व मदत पोहचवण्याचे आदेश दिलेत. भिवंडी, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कर्जत, कसारा, खोपोली येथील पूरपरीस्थितीची माहीती घेतली. पूरात अडकेलेल्या नागरिकांना सूखरूप बाहेर काढण्यासाठी लागेल ती सर्व मदत करा आवश्यकता भासल्यास हेलिकाँप्टरचीही मदत घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश दिले आहेत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: