गोवा देश-विदेश

काँग्रेस देणार नव्या चेहऱ्यांना संधी

पणजी :
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज गोव्यातील ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक घेवुन आगामी विधानसभा निवडणुकीत संघटितपणे काम करुन तसेच युवा तसेच नविन चेहऱ्यांना संधी देत जातियवादी, अलोकशाही व घटनाविरोधी शक्तींचा पराभव करण्याचा सल्ला दिला. गोव्यातील लोकभावनांचा आदर करण्याचे राहुल गांधी यांनी सर्व नेत्यांना सांगितले.

गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो, खासदार फ्रांसिस सार्दिन, माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेंसो तसेच कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सीं वेणुगोपाल व गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव हे बैठकीला उपस्थित होते.

कॉंग्रेस पक्षाला परत सत्तास्थानी आणण्यासाठी रणनिती आखण्यासबंधी बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. येत्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एक​जुटीने काम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिनेश राव यांनी प्रसिद्धी पत्रकातुन दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: