सातारा 

 रेंगडीत ओढा पार करताना चौघे वाहुन गेले

​​मेढा ​(प्रतिनिधी) :
 रेंगडी गावातील ओढ्यावरुन भात लाग​ण करुन येत असताना चैाघे शेतकरी वाहुन गेली असल्याची माहीती जावली तहसिलदार कार्यालयाने दिली आहे . रेगडी गावातीतील चार लोक भात लागन करण्यातकरीता गेली असताना . परत येताना गावातील ओढा पार करत असता एक ज वाहुन गेला. त्याला वाचवण्याकरीता गेलेल्या तिघे देखील वाहुन गेले असुन रेगडीतील हा प्रकार दुसरा असुन. पाच वर्षांपूर्वी देखील याच ओढ्यावरुन जात असताना दोघे वाहुन गेली असल्याची माहीती गावकर्यानकडुन देण्यात येत आहे .

 रेंगडी गावातील मौजे रेंगडेवाडी ता. जावली  येथे  ओढा पार करत असतांना   2 पुरुष व 2  महिला वाहुन गेल्या आहेत​. ​सहदेव गणपत कासुर्डे वय- 60 वर्षभागाबाई सहदेव कासुर्डे वय-50 वर्षतानाबाई किसन कासुर्डे वय-50 वर्षरविंद्र  सहदेव कासुर्डे वय- 30 वर्ष याच्या बचावाकरीता केळघर घाट बंद असल्यामुळे महाबळेश्वर मार्गे मदत करण्याकरीत महसुल विभागाला कळवले आहे असल्याची महत्वपुर्ण माहीती जावली तहसिलदार यांनी दिली .
रेंगडी, ता. जावली यागावातीस त्याच नेमक्या ओढ्यावर हा दुसरी वेळ वाहुन जाण्याचा प्रकार असल्याची माहीती समोर आली आहे . जिल्ह्यात पाऊसाने हाहाःकार माजवला असताना ठीकठीकानी रस्ते वाहुन जाण्याने केळघर घाटातील वाहतुक बंद करण्यात आली आहे .स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने वाहुन गेलेल्याचा शोध सुरु आहे .
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: