मुंबई 

‘सरकारला आमचे पूर्ण सहकार्य’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
चिपळूणसह कोकणातील अनेक भागात पाऊस-पुराच्या स्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन आणि इतरही माझे सहकारी या भागात दौरे करीत आहेत. पिण्याचे पाणी आणि तयार अन्नाची पाकिटे ही आताच्या घडीला तातडीची गरज आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. 


या स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्याशी मी चर्चा करून पिण्याचे पाणी आणि अन्न पाकिटे याबाबत तातडीने लक्ष देण्याची विनंती केली. त्यांनी सरकार ते तत्काळ उपलब्ध करून देईल, असे सांगितले आहे. यात सरकारला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, असेही त्यांना सांगितले.

काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात ज्यांचे प्राण गेले त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सारे या कुटुंबीयांसोबत आहोत.​ ​जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना करतो​, असे त्यांनी सांगितले. ​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: