सातारा 

‘नदी पात्राशेजारील रहिवाशांनो सतर्क रहा’

सातारा (अभयकुमार देशमुख):

जिल्ह्यात मागील काही तासांपासून पावसाची संतधार सुरु आहे. कोयना धरणात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नदीपात्राशेजारील गावातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

कराड शहरातील प्रीतिसंगमावर पाणी आले असून कृष्णामाई मंदीरात पाणी शिरले आहे. तर दत्त चौकातील साईमंदीर पाण्याने वेढले आहे. प्रशासन सर्वाना सुरक्षीत राहण्याचे आवाहन करत आहे
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: