सातारा 

पुराच्या पाण्याने सांडवली गाव खचले…

सातारा (महेश पवार) :
तालुक्यातील परळी खोऱ्यातील सांडवलीसह अन्य पाच गावांचा संपर्क तुटला आहे. आजारी पडले तरी जाऊ शकणार नाही अशी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे. गावात ओढ्याच पाणी शिरलं त्याबरोबर आता जमीन खचू लागली. हे गाव कड्यावर असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. गावात दोनशेपेक्षा जास्त लोकवस्ती असून या गावांचे पुनर्वसन व्हावे यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून ही गेल्या चार वर्षांपासून पुनर्वसन झाले नाही. आता गावांवर मोठं संकट आले कधीही काहीही होऊ शकतं मग सरकार आणि लोकप्रतिनिधी लोक मेल्यावर हार फुले घेऊन येणार का ? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: