गोवा 

​आगरवाडा येथील चार हेक्टर भातशेती पाण्याखाली

पेडणे ​(​निवृत्ती शिरोडकर​)​ :
काबाडकष्ट करून मोठ्या प्रयासाने शेती केलेली काही क्षणात तिळारी प्रकल्पाचे पाणी सोडल्यानंतर शापोरा नदीला उधाण आल्यानंतर आगरवाडा पंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांची चार हेक्टर भात शेती पाण्याखाली आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसानी सोसावी लागली .

२३ रोजी पेडणे कृषी अधिकारी धीरज परब माजी सरपंच अमोल राऊत आदींनी या नुकसानग्रस्त भागाची  पाहणी केली.


मागच्या 14 दिवसा पासून सलग  पेडणे तालुक्याला वादळी वारे व पावसाने झोडपून काढले .पालये कासारवरणे , खुटवळ ,चांदेल इब्रामपूर या भागातील भात शेती आणि केळी बागायतीचे  नुकसान झाले आहे अश्या तक्रारी असतानाच आता आगरवाडा भागातही नुकसानी झाली. बागायतीत व शेतात अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नक्की किती नुकसानी झाली यांचा अंदाज लावणे कठीण आहे. अनेकांची शेती पाण्याखाली गेली. अनेक रस्ते पाण्याखाली गेले  त्यामुळे वाहने जाण्यासाठी अडचणी येत होत्या .

गेल्यावर्षी तेरेखोल व शापोरा या दोन्ही नद्याना महापूर आला होता . त्याची पुनरावृत्ती यंदाही झाली

गेल्यावेळी  किमान १२ कोटींचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले होते . असा दावा शेतकऱ्यांनी केला होता त्यात घरे , गोठे  शेती बागायतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते . मात्र सरकारकडून अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते . शेतकऱ्यांना तुटपुंजी नुकसान भरपाई मिळाली . मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनही नुकसानी मिळाली नाही . त्यात आता नवीन नुकसानी झाली आहे . या परिस्थितीतून आम्ही कसे जगावे अश्या बोलक्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: