गोवा 

भाजप, काँग्रेसचे पदाधिकारी मगोत दाखल

पेडणे (प्रतिनिधी) :
मांद्रेचे नवनिर्वाचित उपसरपंच महादेव हरमलकर आणि माजी सरपंच विद्यमान पंच प्रदीप हडंफडकर या दोन्ही  भाजपा कार्यकर्त्यांनी व कॉंग्रेसचे डूमिंग फर्नांडीस ,माजी सरपंच सेरोफिना फर्नांडीस या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मगोचे नेते जीत आरोलकर यांच्या कार्याकडे आकर्षित होऊन मगो पक्षात प्रवेश केला.

मांद्रेचे उपसरपंच सुभाष आसोलकर यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता​,​ त्यानंतर हे पद खाली होते , २३ रोजी उपसरपंच पदासाठी मांद्रे पंचायत मंडळाची खास बैठक उपसरपंच निवडीसाठी झाली. उपसरपंच पदी महादेव हरमलकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर लगेच उपसरपंच महादेव हरमलकर, माजी सरपंच विद्यमान पंच प्रदीप हडफडकर , माजी सरपंच तथा पंच सेरोफिना फर्नांडीस व डूमिंग फर्रनांडीस यांनी मगो पक्षात थेट प्रवेश करून भाजपा आणि कॉंग्रेसला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला​. ​

२३ रोजी पंचायत सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मगोचे नेते जीत आरोलकर व केंद्रीय समितीचे सदस्य राघोबा गावडे उपस्थित होते​. ​

विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यावर ​येऊन ठेपल्या आहेत आणि त्याच ​पार्श्वभूमीवर मगो पक्षाकडे अनेक जण आकर्षित होवून प्रवेश करत आहेत , एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे राजकारणाची समीकरणे बदलत आहे अनेक पंच मंडळी मगो पक्षात १५ ऑगस्ट नंतर प्रवेश करणार असल्याची माहिती मगोचे नेते जीत आरोलकर यांनी दिली.

जीत आरोलकर यांनी बोलताना मांद्रे मतदार​​संघाचा विकास हा या भागातून निवडून आलेल्या प्रा. पार्सेकर यांनी केला , त्यानंतर साडे चार वर्षात विकासाचा पत्ताच नाही . विकासाला गती देण्यासाठी आता आमदार बदलण्याची गरज आहे , आणि मांद्रे मतदारसंघातून मगो पक्ष परिवर्तन करण्यासाठी सज्ज​ ​झाला आहे, अनेक पक्षाचे कार्यकर्त्ये मगो पक्षात प्रवेश करत आहेत. आज भाजपचे दोन कट्टर कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी महादेव हरमलकर आणि प्रदीप हडंफडकर यांनी शिवाय कॉंग्रेसच्या दोन दिग्गज कार्यकर्त्याना मगोत प्रवेश दिला आहे . ऑगस्टनंतर अनेक पक्षाचे कार्यकर्त्ये मगोत प्रवेश करतील असा दावा जीत आरोलकर यांनी केला आहे.


उपसरपंच महादेव हरमलकर यांनी बोलताना मतभेद विसरून आम्ही एकत्रित आलो आहोत ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून उपसरपंचपद बहाल केले त्यांच्यात मी ऋणी राहणार.

​​सरपंच सुभाष आसोलकर यांनी बोलताना आम्ही विविध पक्षात असलो तरी यापुढे संघटीत होवून जीत आरोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत हि पंचायत जीत आरोलकर यांची म्हटली तरी वावगे ठरणार नाही .

जी सरपंच तथा मगोचे केंद्रीय समितीचे सदस्य राघोबा गावडे यांनी बोलताना या मातीतल्या पक्षाला पुन्हा उभारी मांद्रे मधून दिली जाणार या मतदारसंघातून मगोचे निवडून आलेले भाऊसाहेब बांदोडकर हे मुख्यमंत्री बनले होते , त्याच्याच मतदारसंघातून आता २०२२ च्या निवडणुकीत मगोचा आमदार निवडून आणूया असा निर्धार केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: