गोवा 

आरोबा शिरगाळ गाव पाण्याखाली…

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
धारगळ पंचायत क्षेत्रातील आरोबा शिरगाळ हा पूर्ण रस्ता पाण्याखाली , शिवाय एकूण १५ घरेही पाण्यात असल्याने  त्याना घराबाहेर पडता येत नाही.  शिवाय वीज प्रवाह खंडित झाला आहे. रस्त्याला शेतीला नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याने अलीकडून पलीकडे नेण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो. हा परिसर पूर्णपणे पाण्यात जाण्याची हि दुसरी वेळ आहे.

आरोबा शिरगाळ येथील एकूण १५ घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसानी होण्याची दुर्घटना गत वर्षीप्रमाणेच यंदाही त्याची पुनरावृत्ती झाली , वर्षभरात शासनाला  कोणतेच उपाय योजना करता आली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

तिळारीतून पाणी सोडल्याने शापोरा नदीला उधाण आले . पहाटे सर्वत्र आला, सर्व घरामध्ये पाणी शिरले , त्यात महत्वाचे सामानही वाहून गेले. जेवणाचे सामान पाण्यात बुडाले. वीज उपकरणे निकामी बनली. आरोबा ते शीरगाळ पर्यंतचा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले, त्यामुळे कोणत्याच प्रकारची वाहने या रस्त्यावरून जात नव्हती. मदत कार्य सुरु होते , लोकाना ने आण करण्यासाठी स्थानिकानीच पुढाकार घेवून होड्यांची सोय केली होती .

या घटनेची उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी २३ रोजी दुपारी दोन वाजता पाहणी केली, तीही रस्त्यावर राहून. रस्ता कसा पूर्ण पाण्याखाली गेला व घरे कशी पाण्यात आहेत ते वरती राहून पाहिले.

शिरगाळ बांधाला उंची द्यावी , रस्त्याला उंची द्यावी अशी मागणी स्थानिकांनी यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यासमोर मागणी केली असता, बांधला उंची देण्यासाठी जमीनदारांचा ना हरकत दाखला मिळाला तर  काम करण्यास अडचणी येणार नाही. अधिकाऱ्यांना उपाय योजना आणि प्रक्रिया करण्याची सुचना केली .  मंत्री आजगावकर यांनी यावेळी काहीना वैयक्तिक पातळीवर मदत केली.

जोरदार पावसामुळे आणि तिळारी प्रकल्पाचे पाणी सोडल्याचा फटका पेडणे तालुक्यातील इब्राह्मपुर ,हलर्ण तलर्ण ,कासारवरणे चांदेल या शपोरा नदी किनारी भागात शिवाय शिरगाळ आरोबा या गावांना फटका बसला. करोडो रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली. आज थोड्या प्रमाणात पावसाने उसंत घेतल्यामुळे हळू हळू पाणी ओसरू लागली ,परिस्थिती पूर्वपदावर येत आहे मात्र घरांत पाणी शिरल्याने ओलसर भाग चिखल घरात शिरल्याने घर संसार थाटाने कठीण आहे ,मातीच्या घराचे भीती फुगलेल्या असून काही घरांचा धोका अजून टळलेला नाही ,मात्र पाणी हळू हळू कमी होत असल्याने आणि रस्तेही स्पष्ट दिसत असल्याने एका बाजूने समाधान व्यक्त होत आहे ,तर दुसऱ्या बाजूने पुरात अडकलेल्याची स्थिती भयानक आहे आपल्या पाणी साचलेल्या घरात संसार कसा थाटावा या मनस्थितीत आहे .

या पुरामुळे करोडो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून , सरकारने पूरग्रस्त नागरिकांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: