गोवा 

इब्राहमपूर, चांदेल, हसापूर, कासारवर्णे, हणखणे, तोरसे गावे पाण्यात

पेडणे (प्रतिनिधी) :
तालुक्यातील इब्रामपूर , चांदेल , हसापुर , कासार्वरणे , हणखणे हळर्ण तळर्ण तोरसे या भागातील शापोरा आणि तेरेखोल नदीला महापूर आल्याने परिसरातील शेती बागायतीला नदीचे स्वरूप प्राप्त झाले , अनेक घराणी पाणी शिरून वीज उपकरणे निकामी झाली , रस्त्ये पाण्याखाली गेल्याने अलीकडून पलीकडे जाण्यासाठी मार्ग बंद झाल्याने जनसंपर्क तुटला , वीज प्रवाह खंडित झाला , काही जणाच्या गाई गोठ्यात पाणी शिरल्याने मारून गेल्या किमान ८०० लिटर दुध इब्रामपूर येथील शेतकऱ्यांना दुग्ध सोसाएटीमध्ये घालता आले नसल्याने नुकसानी सोसावी लागली, शेतात भात रोपे तरवा काढून ठेवला होता तो वाहून गेला, विहिरीला बसवलेले पंप निकामी झाले , केळ्याच्या बागायती उभ्याच्या उभ्या आडव्या झाल्या. पूर्णपणे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले.

या भागाची तातडीने स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी २३ रोजी दुपारी या भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याची सुचना केली , शिवाय सरकारची ज्यावेळी मदत मिळेल तेव्हा मिळेल , मंत्री आजगावकर यांनी त्वरित काही शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर मदत केली .

यावेळी पेडणे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर , पेडणे कृषी अधिकारी प्रसाद परब , जलसिंचन विभागाचे अधिकारी अनिल परुळेकर , सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचे अधिकारी , श्री नाईक , अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव परवार , पेडणे मामलेदार अनंत माळीक , पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी  , पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस , आबा तळकटकर ज्ञानेश्वर परब आदी उपस्थित होते .

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना ज्यांची ज्यांची नुकसानी झाली त्यांचा अहवाल सादर करण्याची सुचना केली , आपण मुख्यमंत्री  डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करून नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळवून देण्याची ग्वाही दिली .

तिळारीचे काल रात्री पाणी सोडल्यामुळे पेडणे तालुक्यातील शापोरा आणि तेरेखोल नदीला उधाण आले , नदीकाठच्या गावाना , घराना धोका निर्माण झाला . रात्रीच पाणी सोडल्याने अनेकजण संकटात सापडले त्याना मदत कार्य करण्यास जनसंपर्कतुटल्याने  कुणी पोचले नाहीत  . घरात  पाणी शिरल्याने घरातील कडधान्य तांदूळ सामानाची नुकसानी झाली , वीज उपकरणे निकामी ठरली .

गेल्यावर्षीची नुकसानी अजून मिळाली नाही त्याच पाश्वभूमीवर परत यंदाही लाखो रुपयांची नुकसानी झाली , शेतीची ८० हेक्टर नुकसानी झाली असल्याचा अंदाज कृषी अधिकारी प्रसाद परब यांनी व्यक्त केला.  त्यात केळी भातशेती , उस . भेंडी  , भाजीपाला  याचा समावेश आहे .

चांदेल , बैलपार ,हलर्ण तळर्ण , कासार्वरणे या भागातील रस्त्ये पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने लोकांची बरीच धांदल झाली , लोकाना कामावर जाता आले नाही , जनसंपर्क तुटला , कुणी मदतीला धावून जाणार तर मार्ग बंद होते . बेभरवशाची टेलिफोन सेवा  विस्कळीत झाली .

अशोक धावूस्कर या शेतकऱ्यांनी माहिती देताना सकाळीच ते पहाटे पर्यंत सर्व रस्त्यावर पाणी आल्यामुळे व वाहने जात नसल्याने आम्हाला दुध घेवून जाता आले नाही . त्यामुळे किमान ८०० लिटर दुध वाया गेल्याचे सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: