सातारा 

​’आम्ही जिवंत आहे का हे तरी बघायला या’

रहिमतपूर पालिकेला नागरिकांचा सल्ला 

सातारा (महेश पवार) :
जिल्ह्यात पावसाने लोकांची फार मोठी दैना उडाली , रहिमतपूर पालिकेच्या हद्दीतील नहरवाडी गावातील कमंडलू ओढ्यावरचा पुल पुर्णपणे पाण्याखाली गेला आहे.  200 नागरिकाचा संपर्क पुर्णपणे तुटला आहे. अद्यापही रहीमतपूर नगरपालेकेचा कुठल्याही नगरसेवकांचा किंवा नगराध्याक्षांचा कुठलाही संदेश आला नाही. काळजी घ्या घेऊ नका जिवंत आहात का मेला म्हणून एकही फोन किंवा जातीने पाहणी करण्यासाठी कोणीही येत आले नाही.  हे सर्व पुराचे पाणी रहीमतपूरवरून येते पण कुठलाही सतर्क रहा म्हणून तलाठी,  सर्कल किंवा रहिमतपूर नगरपालिकेचा काळजीपूर्वक सांगावा दिला गेला नाही. गेले कित्येक वर्षे हे चालू आहे. हा पुल निम्मा तुटला आहे. आता वाहूनहही गेला आहे, गेले सात आठ वर्षांपासून फक्त त्या खड्ड्यात वाळू किंवा माती टाकली जाते फक्त मलमपट्टीसाठी पण प्रत्यक्षात पालिका लक्ष घालत नसल्याने कामकाजाबाबत नागरिक आता आक्रमक झाले आहेत. 

तर दुसरीकडे कृष्णा नदीला पूर आल्याने शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले , शेती पंप बुडाले आता विचारपूस सोडा, आता पालिका प्रशासनाने आम्ही जिवंत आहे का मेलो हे तरी पहायला येण्याचा सल्ला दिला आहे. 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: