गोवा 

‘राज्यातील ​मतदारांचा विश्वास जिंका’

पणजी :
लोकांशी चांगले संबंध ​ठेवून मतदारसंघातील विकासकामांना गती देऊन मतदारांचा विश्वास जिंकण्या​चे आवाहन भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केले. 

भाजपच्या पदाधिकाऱ्यां​सोबत बैठकीमध्ये ते बोलत होते. ताज विवांतामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ​हि बैठक पार पडली. यावेळी जे पी नड्डा यांनी भाजपच्या १०० पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
उद्याही जे पी नड्डा गोव्यात असून उद्याही भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या वेगवेगळ्या बैठका होण्याची शक्यता आहे. राज्यातील तिकीट वाटपाचा मुद्दा असेल, अंतर्गत बंडाळी असेल किंवा इतर राजकीय प्रतिस्पर्ध्यांना कसं तोडं द्यायचं, याबाबतची रणनिती असेल, याबाबतही नड्डा यांच्या गोवा दौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा होणार, हे नक्की.
​​दरम्यान, आज दुपारी २ वाजता जे. पी. नड्डा यांचं दाबोळी विमानतळावर दणक्यात स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांसह भाजपचे ज्येष्ठ नेत्यांचीही जातीनं नड्डा यांच्या स्वागतासाठी हजेरी पाहायला मिळाली होती. मोठ्या संख्येनं कार्यकर्तेही यावेळी नड्डा यांच्या स्वागतासाठी दाबोळी विमानतळावर दाखल होते.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: