गोवा 

पूरग्रस्तांसाठी सरसावला काँग्रेसचा हात

मडगाव :
गोव्यातील अनेक भागात पूराने हाहाकार माजवून शेकडो घरांचे नुकसान केले आहे. सावर्डे, सत्तरी, वाळपई, माशेल, होंडा, सावय वेरें तसेच इतर भागात लोकांचे भयंकर नुकसान झाले आहे. सरकारने ताबडतोब सर्व पूरग्रस्ताना रोख मदत व एक महिन्याचे जीवनावश्यक सामग्री  द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली.

विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर तसेच इतर पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने आज सावर्डे भागातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला व लोकांना जीवनावश्यक सामग्री, पाणी तसेच इतर वस्तुंचा पुरवठा करून मदत करण्याचा प्रयत्न केला.

सरकारने पाहणी अहवाल व इतर सरकारी सोपस्कारांची वाट न पाहता ताबडतोब लोकांना रोख रक्कम देणे गरजेचे आहे. लोकांचे कपडे, भांडी व इतर सर्व सामान पूरात वाहुन गेले आहे. काणकोण येथे  पूर  आला तेव्हा माझ्या सरकारने लोकांना रोख रक्कम देत दिलासा प्रयत्न केला होता. संकटकाळात लोकांना मदत देणे सरकारचे कर्तव्य आहे  असे दिगंबर कामत म्हणाले.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सरकारने त्वरित लोकांना सर्व प्रकारची मदत करावी अशी मागणी केली. काल दिल्लीहून गोव्यात पोचल्यानंतर मी थेट सत्तरी तालुक्यात गेलो व युवक कॉंग्रेस मार्फत लोकांना मदत देण्याचे प्रयत्न केले. युवक कॉंग्रेस आपले मदत कार्य सुरूच ठेवणार असल्याचे गिरीश चोडणकर म्हणाले.

युवक कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर  यांनी काल व आज पूरग्रस्त भागात जातीने उपस्थित राहून मदत कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. पूराने हाहाकार माजवला असुन, लोकांना मदत करणे आमची जबाबदारी आहे असल्याचे वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे पदाधिकारी संकल्प आमोणकर, जनार्दन भांडारी, अर्चित नाईक, साईश आरोसकर, मनोहर नाईक तसेच गट समित्यांचे इतर पदाधिकारी या मदत कार्यात काल व आज सहभागी झाले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: