गोवा 

राज्यात सावंत सरकारची कामगिरी उत्तम

भाजप अध्यक्षांनी थोपटली मुख्यमंत्र्यांची पाठ

पणजी :
राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार चांगला विकास करत आहे. काँग्रेस पक्ष हे भरकटलेले जहाज असून त्याला नाविच नाही. वारे जसे वाहते त्या दिशेने ते जात असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पणजीतील पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे. काँग्रसेकडून फोन टॅपिंग करण्यात येत असलेले आरोप हे निराधार व काही कारण नसलेले आहेत असे स्पष्टीकरण त्यांनी केले.

२०१७ ते २०२१ या काळात भाजप सरकारने राज्यात केलेल्या विकासकामांचा पाहता चांगली प्रगती केली आहे. गोवा हे छोटे राज्य असूनही राज्याने विकासकामांत सातव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. पूर्वीपेक्षा आता गोव्यातील प्रतिमा बदलली आहे. कोविड काळात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले तरी विकासकामांत राज्य मागे न राहता पुढे जात आहे. मोपा विमानतळ पुढील वर्षी २०२२ मध्ये सुरू होणार आहेत तसेच फार्मा हब व शैक्षणिक हब उभे राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

राज्यात आगागमी निवडणुकीपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे नेतृत्व दिले जाणार आहे का असा प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गेल्या चार वर्षात चांगली प्रगती केली आहे व योग्य दिशेने पुढे जात यशस्वी ठरत आहे. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे दिल्लीत चांगले काम करत असल्याचे स्पष्टीकरण करत प्रश्‍नाला थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. भाजप पक्ष निवडणुकीत उमेदवारी देताना फॅमिलीराजविरोधात आहे तर आगामी निवडणुकीत गोव्यात एकाच कुटुंबामध्ये दोन उमेदवारी देणार का यासंदर्भात बोलताना त्यांना सांगितले की, यासंदर्भात गोव्याबाबत मला अधिक माहिती नाही मात्र पक्षाची निवडणूक समिती यासंदर्भात निर्णय घेईल.

नड्डा यांनी काल व आजच्या भेटीवेळी पक्षाच्या विविध बैठका घेऊन पक्ष अधिक मजबूत देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले आहे. मंत्री, आमदार, जिल्हा, तालुका, पक्ष गट मंडळ अध्यक्ष, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते तसेच विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली असून या बैठकीतील चर्चेमधून मी आशावादी तसेच पक्षाच्या कामाबाबत समाधानी आहे. प्रत्येक मंत्री व आमदार तसेच कार्यकर्ते कामात झोकून देत आहेत. पक्षाचे काम करताना त्यांचा आत्मविश्‍वास वाढलेला दिसून आला. जे आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत त्यांच्याबरोबर वैयक्तिक चर्चा केली त्यांनीही भाजपच्या कार्यशैलीबाबत समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळेच भाजप पक्ष हा गोव्यात योग्य दिशेने व वेळेनुसार पुढे जात असल्याचे मत नड्डा यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात गावे पाण्याखाली गेली. काही ठिकाणी आलेल्या पुरामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले. नुकसान झालेल्यांना मदत करण्याचे निर्देश पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. या नुकसानीचा त्वरित सर्वे करून मुख्यमंत्री व पंतप्रधान मदतनिधीमधून त्यांना मदत देण्याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यासोबत चर्चा झाली आहे. राज्यात आलेल्या या पुरामुळे लोकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागल्याने त्यांच्या दुःखात पक्ष सहभागी आहे.

mangeshi
गोवा दौऱ्यावर असलेले भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज सकाळी मंगेशी देवस्थानला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: