गोवा 

९० वर्षानंतर ‘उजळणार’ धनगरवाडा 

काँग्रेस नेते सचिन परब यांचा पुढाकार 

पेडणे (प्रतिनिधी) :
जन्माला येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला जीवन जगण्यासाठी अन्न निवारा कपडा रोटी मकान या मुलभूत गरजा आवश्यक आहेत , एक नव्हे दोन नव्हे तब्बल ९० वर्षापेक्षा जास्त काळानंतरही तुये येथील ४ धनगर समाजाच्या झोपड्यात विजेचे बल्ब पेटले नव्हते. आता बुधवार दिनांक २८ रोजी मांद्रेचे युवा कोन्ग्रेस नेते सचिन परब यांच्या प्रयत्नाने विजेचे दिवे पेटवून खऱ्या अर्थाने दिवाळी दसरा साजरा होणार आहे.

कॉंग्रेसचे युवा नेते सचिन परब यांच्या प्रयत्नाने तुये येथील छाया झोरे , सद्गुरू शिंदे , बाबू शिंदे आणि वागू वरक यांच्या झोपड्याना सोलार मुळे दिवे पेटणार आहे , हे सामाजिक कार्य आणि पुण्याचे काम सचिन परब यांच्यामुळे हा परिसर प्रकाशमान होणार आहे .

मागच्या ९० पेक्षा जास्त वर्षापासून या ठिकाणी झोपड्या उभारून धनगर समाजाची चार कुटुंबीय राहतात . भाटकरांच्या जमिनीत झोपड्या उभारून हि मंडळी आपला उदरनिर्वाह चालवतात , ना रस्ता ना वीज ना पाणी अश्या स्थितीत राहणाऱ्या कुटुंबीयाकडे आजही प्रशासनाचे लक्ष नाही , किंवा  निवडून आलेल्या आमदार खासदार मंत्री  , मुख्यमंत्री याना त्यांची समस्या सोडवता आली नाही .

मतांची गणिते चुकली ?
निवडणुका कसल्याही असो त्या मग पंचायत , जिल्हा पंचायत , विधान सभा लोकसभा पातळीवरील असो , त्या घरात किती मते मिळतील एक गठ्ठा मते असती तर सहज राज्यकर्त्यांचे त्या ठिकाणी लक्ष जाते .मात्र या परिसरात केवळ १० ते बारा मतदार आहेत .१२ मतांच्या फरकाचा परिणाम राज्यकर्त्यावर होत नसल्याने या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे .

राज्यकर्त्याकडे व्यथा मांडली
प्रत्येक निवडणुकीच्या काळात उमेदवार मतासाठी त्या झोपडीत जात असे , त्या त्यावेळी स्थानिकांनी आपल्या कैफियती मांडल्या . परतू आजपर्यंत राजकर्त्यांनी कानावरील हात हटवले नसल्याने त्याच्या समस्या आजही अखंडितपणे आहे
तुये या ठिकाणी धनगर समाजाची तिसरी पिढी राहते , एकूण वीस लोकसंख्या असलेल्या या झोपड्यातील समस्या सोडवाव्यात या साठी गेल्यावर्षी तुयेचे सरपंच यांच्या नैतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी राविशेखर निपाणीकर याना निवेदन सादर केले होते , त्याची आजपर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नाही .

सोलर विजेची बुधवारी उद्घाटन
९० वर्षानंतर प्रथमच या तीन धनगर समाजाच्या झोपड्यात विजेचे दिवे बल्ब पेटले जाणार आहे , झोपड्यात अनेक वर्षानंतर वीज दिव्याचा प्रकाश अनुभवायला या कुटुंबियाना मिळणार आहे आणि हे पुण्य काम कॉंग्रेसचे युवा नेते सचिन परब यांनी जवळ जवळ एक लाख रुपये खर्च करून सोलार विजेची सोय केली आहे . या उपक्रमाचा शुभारंभ बुधवार दिनांक २८ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे , नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते सचिन परब यांनी केले आहे .

पेडणे तालुक्यात आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ होत आहे , आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम , रवींद्र भवन , आयटी प्रकल्प , मनोरंजन ग्राम अश्या वल्गना केल्या जातात हे प्रकल्प येत असतानाच मात्र तुये येथील ४ धनगर कुटुंबीयांकडे आज पर्यंत प्रशासनाचे लक्ष गेले नाही हीच शोकांतिका आहे . नवनवीन प्रकल्पाचे स्वागत आहे मात्र अगोदर स्थानिकाना मुलभूत गरजाही पुरवण्यावर सरकारने भर द्यायला हवा होता.

गोवा मुक्त होवून ६० वर्षे झाली मात्र आजही या झोपड्यात वीज पाणी रस्ता या मुलभूत सुविधा पुरवण्यास शासन अपयशी ठरले , या धनगर कुटुंबियांच्या मतावर सरपंच , जिल्हा पंचायत सदस्य , आमदार , खासदार आणि मंत्री मुख्यमंत्री झाले मात्र या झोपड्यातील अंधार आजही दूर झाला नाही , प्रशासन या झोपड्यांच्या दारी पोचले नाही .

पुण्यकामाची संधी ; सचिन परब
मांद्रेचे युवा नेते सचिन परब यांनी माहिती देताना या झोपड्यामध्ये विजेची सोय नसल्याचे मला आपल्याकाही कार्यकर्त्यांनी माहिती दिली ,आपण घटनास्थळी जावून त्यांच्या  कैफियती ऐकल्या त्यावेळी  आपले डोळे भरून आले , आजही गोवा मुक्त होऊन ६० वर्षे झाली मात्र आजपर्यंत त्याना सुविधा मिळत नाही , आपण त्याना विजेची सोय करण्यासाठी सोलार दिवे बसून दिलेले आहे .हे पुण्याचे काम करण्याची आपल्याला संधी मिळते हे आपले भाग्य आहे , आपण कधी मतांची गणिते करत नाही . आधी  सुविधा पोचल्या पाहिजेत कमी मते आहेत म्हणून कदाचित राजकर्त्यांनी दुर्लक्ष केले असेल असे सचिन परब म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: