मुंबई 

पूरग्रस्तांसाठी युवासेनेचे ‘सेवारथ’ 

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
गेल्या २४ तासात महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे बरीच जीवितहानी झाली आहे. काही नागरिक अजूनही दरडीखाली अडकले असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेनेमार्फत मुंबई उपनगर भागातून जीवनावश्यक वस्तूंचे दहा ट्रक चिपळूण, महाड आणि खेडच्या दिशेने निघाले आहेत. यामध्ये ब्लॅंकेट, कपडे, तयार खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, औषधे, सॅनिटायझर, मास्क इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.

मदत कार्याचा हा पहिला टप्पा असून शक्य तेवढी सर्व मदत करण्याचा युवासेनेचा मानस आहे, असे युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश रामदास कदम यांनी सांगितले. यावेळी शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: