सातारा 

साताऱ्याच्या विद्यार्थ्यांचा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये

सातारा (महेश पवार) :
येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा विद्यार्थी आदित्य राजेश मोरे याने लिहिलेला शोधनिबंध अमेरिकेतील ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मसी अँड फार्मकॉलॉजी’ या विज्ञानविषयक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

“अल्टरनेटिव्ह डेट रेप ड्रग” असे शीर्षक असलेल्या या शोधनिबंधात अंमली पदार्थ मानवी जठरातील आम्लात विरघळण्याच्या क्षमतेचा ऊहापोह केला आहे. मोठमोठ्या पार्ट्या तसेच नाईट क्लबमध्ये गुंगीच्या औषधांचा गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणावर वापर होतो. हे विशेष ड्रग घेतल्याने वास्तव आणि कल्पना यातील फरक कळत नाही आणि मुली दुष्कृत्यांना बळी पडतात. या महत्त्वपूर्ण बाबींवर आदित्यने प्रकाश टाकला आहे.


फॉरेन्सिक सायन्स शाखेच्या शेवटच्या वर्षात आदित्य शिकत असून, या शोधनिबंधात स्मितेश नलगे आणि डॉ. अनिता माळी यांनी योगदान दिले. कॅनडा, जपान, चीन, स्पेन, अमेरिका, इटली आदी देशांमधील संशोधकांनी संपादक या नात्याने आदित्याचा शोधनिबंध या जर्नलमध्ये स्वीकारल्याबद्दल त्याचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: