सातारा 

 जवान श्रीमंत काळंगे यांचे सियाचीन येथे निधन

​सातारा (महेश पवार) :
अंगापूर वर्णे ता सातारा येथिल जवान श्रीमंत सुरेश काळंगे ​(४२​)​ हे भारतीय सैन्यदलात मराठा लाइट इंफॅटरी (एम एल आय) या बटालियन मध्ये कार्यरत होते.गेल्या महिनाभरापासून  ते आजारी होते.त्यांचेवर सैन्य दलाच्या दवाखान्यातच  सियाचीन या ठिकाणी उपचार सुरू होते.काल पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांचे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण वर्णे येथे  झाले होते तर अपशिंगे येथे अकरावीत असतानाच ते  १९९८ साली सैन्यात दाखल झाले. त्यांची सेवा २४ वर्षे एवढी झालेली आहे. सध्या ते सियाचीन येथे एन.एस.जी कमांडो म्हणून कार्यरत होते सुट्टी संपवून नुकतेच सैन्यात हजर झाले होते. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांचेवर उपचार सुरू होते.  या उपचारादरम्यान शनिवारी पहाटे त्यांनी  अखेरच श्वास घेवून जगाचा निरोप घेतला. त्यांचे पार्थिव सोमवारी सकाळी त्यांचे मुळ गांवी वर्णे ता सातारा येथे आणले जाणार  आहे.
त्यांच्या कुटुबांला सैनिकी परंपरा असून त्यांचे आजोबा स्व. सोनबा काळंगे सैन्यात होते. त्याकाळात त्यांनी गावात सैन्य भरती आणली होती.​ ​त्यांच्यामुळे अनेक मुले त्याकाळात भरती झाली होती​. ​त्यांचे बंधू विनायक, लक्ष्मण तर मुलगा सचिन हे सुध्दा सैन्यदलात  सध्या सेवा देत आहेत.
​परिसरातील युवकांनी सैन्यदलात दाखल व्हावे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. त्यासाठी ते मुलांचा सराव घेत असत.तसेच सुट्टीच्या कालावधीमध्ये ते मुलांच्या माध्यमातून आबापूरी डोंगरावर श्रमदान करून  हजारो वृक्षांची लागवड करीत असत ते वृक्ष आज हिरवाईने डोलत आहेत. त्यांचा गावच्या सामाजिक कार्यात मोठा सहभाग होता.त्यांचे पश्चात आई,पत्नी,दोन मुले,दोन सैन्यात असणारे बंधू असा परीवार आहे​.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: