सातारा 

‘महाबळेश्वर’च्या मदतीला धावले शिवसैनिक

​​पाचगणी​ (प्रतिनिधी) :
महाबळेश्वर तालुक्यात पाव​साचा कहराने १८ जागी रस्ता खचला असुन ९ जा​​गी दरड कोसळली आहे . कांदाटी खोर्याचा संपर्क सुटला असुन रस्ता खचल्याने दळणवळनाचा प्रश्न बिकट झाला आहे . मात्र अशा बिकट ​परिस्थितीत शिवसैनिक मात्र तालुक्यांतील ​प्रशासनाला मदत करत ​दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्या​करीता ​प्रयत्न करत आहेत. ​

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख राजेश कुभांरदरे याच्या उपस्थित सार्वजनिक बाधकाम विभागाला मदत करत असतानाचे बोलके चित्र महाबळेश्वर तालुक्यातील आपात्कालीन परीस्थीत दिसत आहे . महाबळेश्वर तापोळा रस्ता खचला असल्यामुळे माघरमार्गे तापोळा रस्ता खुला करण्याकरीता शिवसैनिक स्व: ता प्रयत्न करत आहेत .
महाबळेश्वर तालुक्याला पावसाचा जोरदार फटका बसला ​असून तालुक्यांतील वाघोरी सातारा रस्ता​, ​तापोळा महाबळेश्वर रस्ता, तापोळा वानवली ते आटेगाव रस्ता , पाली ते वेळापुर रस्ता , कोट्रुशी ते तापोळा , माचुतर रस्ता , शासकीय विश्रामगृह,गोरांबे येथील रस्ता खचला , शिवकालीन खेडे येथे रस्ता खचला , घोणसपुर रस्ता खचला , रुळे ते गावडोशी रस्ता खचला , आहीर ते आवळण रस्ता खचला असल्याची नोंद महाबळेश्नर तहसिल​ ​कार्यालयाकडे करण्यात आली आहे.
महाबळेश्वर तालुक्यांतील ९ जागी दरड कोसळली असल्याने तालुक्यांत यामुळे नुकसान झाले आहे​.​तालुक्यांतील प्रामुख्याने धावरी येथे डोंगर खचला आहे .बिरवाडी , कासरुड , चतुरबेट , गोरुशी , येथे दरड कोसळली असुन चतुरबेट येथे वाहतुकीचा पुल वाहुन गेला आहे​. महाबळेश्वर तालुक्यांतील २३ घरांचे नुकसान अति पा​वसाने झाले आहे​. महाबळेश्वर तालुक्यांतील भात व नाचणी​चे आणि भिलार ​परीसरातील  बटाटा पिकाचे ​१०० टक्के नुकसान ​झाले आहे​. 
या सगळ्या आपत्कालीन ​परिस्थितीत घटनास्थळी माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, शहरप्रमुख राजा गुजर, मधुसागरचे महादेव जाधव, गणेश जाधव, रुपेश सकपाळ, पुतळाजी सकपाळ,दशरथ कदम,दिनेश संकपाळ, अरुण जाधव,राजेंद्र चाेरगे,रवी पवार आणि मांघर व घोडे पारूट युवा वर्ग सगळे शिवसैनिक झटुन काम कर​ताना दिसत आहेत. ​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: