सातारा 

जावलीत ‘त्या’ मृतांच्या वारसांना ५ लाख सुपूर्द

आमदार शिवेंद्रराजेंनी केला यशस्वी पाठपुरावा

जावली (महेश पवार) :

रेंगडी ता. जावली येथील चार व वाटंबे येथील एक असे पाच जण केळघर घाटातील ओढ्याला आलेल्या पुरातुन वाहुन गेले होते. यामध्ये पाचही जणांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे शासनाच्या वतीने या कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखाचा मदतीचा धनादेश सपुर्द करण्यात आला.महाविकास आघाडी सरकारकडुन लवकरात लवकर मदत मिळावी म्हणुन सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे याचा पाठपुरावा महत्वाचा ठरला आहे.

राज्याचे उपमुख्यमत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार कडुन सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे मृतांना आर्थीक मदतीची घोषणा केली होती. जावलीमध्ये रेगडी येथे घटना घडल्यापासुन जावलीच्या तहसिलदारांना मृत झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदतीचे प्रस्ताव सादर करावे याबाबत पाठपुरावा केला होता. जावलीतील रेंगडी येथील घटनेमध्ये मृतांना प्रत्येकी ९ लाख देण्यात येणार आहेत यापैकी ५ लाख रुपयांचा प्राथमिक टप्पा मृताच्या नातेवाईकांना देण्यात आला आहे.

यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रांतअधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतिष बुद्धे, ज्ञानदेव रांजणे, जि .प . सदस्य  राजु भोसले, सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, जेष्ठ शिवसेना नेते एस. एस. पार्टे, सरपंच बाबुराव कासुर्डे,  तलाठी मकरध्वज डोईफोटे, ग्रामसेवक रविकांत  सपकाळ , सागर धनावडे, प्रमोद घाडगे यांचे प्रमुख उपस्थितीत धनादेश सपूर्द करण्यात आले.

यावेळी आ. शिवेंद्रसिहराजे भोसले म्हणाले जावली तालुक्यातील केळघर परिसरात फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये जिवित हानिसह वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली असुन यामध्ये शेतीसह परिसरातील पुल वाहुन गेले असुन विहीरी गाडुन गेल्या आहेत तर महावितणचे प्रचंड नुकसान झाले आहे परिसरातील लाईटचे खांब तुटुन वाहुन गेले आहेत परिसरात लाईट नाही.

शेतीचे पंचनामे ताबडतोब करण्याचे आदेश दिले असून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.

यावेळी मोहनराव कासुर्डे, बबन बेलोशे, प्रविण कांबळे, संतोष कासुर्डे, सुभाष शेलार, लहुराज सुर्वे, बाळासाहेब शिर्के, रघुनाथ खुटेकर, नंदकुमार चिकणे, मोहन भणगे यांचेसह केळघर विभागातील सर्वपक्षिय कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: