गोवा 

‘महिलांच्या प्रगतीसाठी महिला मंच कार्यरत’

पेडणे (प्रतिनिधी) :
महिलांनी चार भिंतीच्या आड न राहता स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ,आणि त्यासाठी मिशन फॉर लोकल संस्थेने महिला मंच स्थापना केला  व महिलांच्या प्रगतीसाठी हा मंच कार्यरत राहणार आहे , त्यासाठी महिलांनी या मंचा अतर्गत महिलासाठी विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जाईल त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मिशन फॉर लोकल महिला मंचाच्या संस्थापक रश्मी उर्फ गीता  राजन कोरगावकर यांनी केले .कोरगाव येथी मिशन फॉर लोकल तर्फे महिला मंचाची स्थापना करून महिलांसाठी खास कार्यालय २७ रोजी कोरगाव येथे उद्घाटन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच राजू नर्से , पंच सदस्य वसंत देसाई , माजी पंच अक्षता कोरगावकर ,दिशा कामुलकर , प्रांजल गणपुले, काजल शिंदे , मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर , माजी सरपंच राजू नर्से आदी उपस्थित होते.

प्रांजल गणपुले यांनी सूत्रसंचालन केले . स्वाती वेंगुर्लेकर , नेहा नर्से व काजल शिंदे आदींनी पाहुण्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

मिशन फॉर लोक संस्थेने महिला मंच स्थापन करून स्वतंत्र कार्यालय सुरु केले , त्याचे उद्घाटन केल्यानंतर हे कार्यालय महिलाना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आहे , हे कार्यालय महिलांचे आहे , महिलांनी आपल्या पायावर उभे राहून जे घरगुती तयार केलेले पदार्थ या कार्यालयात आणून विकू शकतात असे जाहीर केले.

कोरगाव पंचायत क्षेत्रातील महिलाना या महिला मंच तर्फे विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाईल असे संस्थापक रश्मी उर्फ  गीता राजन कोरगावकर यांनी जाहीर केले.


हातात हात घालून काम करुया
रश्मी उर्फ गीता राजन कोरगावकर यांनी महिलाना मार्गदर्शन करताना सर्व महिलांनी हातात हात घालून संघटीत होवुया , महिलांचे प्रश्न महिलाच सोडवू शकतात ,त्यासाठी महिला मंचाच्या बेनारखाली काम करुया असे आवाहन केले .महिलासाठी मिशन
कोरगाव पंचायत क्षेत्रातील महिलांनी आता स्वावलंबी बनण्यासाठी महिला मंच हे महिलासाठी मिशन आहे . महिलांनी एकत्रित येवून त्याना या मंचातर्फे विविध प्रकारचे प्रशिक्षण देवून स्वताचा व्यवसाय उभारण्यासाठी मदत केली जाईल असे रश्मी कोरगावकर यांनी सांगितले .महिलाबरोबरच ज्या युवती काही कमी शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठीही वेगवेगळे कोर्स दिले जाईल त्याचा लाभ घ्या असे आवाहन कोरगावकर यांनी केले .

महिलांच्या उन्नतीसाठी मिशन
पंच वसंत देसाई यांनी बोलताना कोरगाव पंचायत क्षेत्रातील महिलांच्या उन्नतीसाठी मिशन फॉर लोकल कार्यरत आहे , महिलांच्या प्रगतीसाठी महिलाना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विविध प्रशिक्षणे देण्याच्या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या .

‘पक्ष बाजूला ठेवून लाभ घ्या’
मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी बोलताना पक्षीय मतभेद बाजूला ठेवून महिला मंचाच्या बेनरखाली सर्व महिलांनी पुढे यावे, आणि स्वावलंबी बनण्यासाठी विविध प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी  कोरगाव सरपंच उमा साळगावकर यांनी महिला मंचाला शुभेच्छा दिल्या.  काजल शिंदे यांनी आभार मानले

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: