सातारा 

साताऱ्यातील ४९ गावांच्या भूस्खलनाचे नागपूर कनेक्शन

​​मेढा ​(प्रतिनिधी) :
​सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी​ होऊन जिल्ह्यातील पाटण , महाबळेश्वर , वाई ,जावली तालुक्यात भुसंखलन  व दरडी कोसळुन ​मोठ्याप्रमाणात  मनुष्यहानी व मालमत्ते​चे  नुकसान​ झाले आहे. ​एकीकडे प्रशासन ​ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर ​काढत असताना पुनर्पवसनाचा प्रश्न मार्गी लावु ​असे सांगत असताना जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन खात्यातून खळबळज​नक माहिती समोर आली आहे.  साताऱ्यातील या ४९ गावांच्या भूस्खलनामागे नागपूर कनेक्शन असल्याचे कळते आहे. 

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यांतील देवकुखवाडी , पाटण तालुक्यांतील आंबेघर , ढोकावळे , व कोयना विभागातील मोठ्या प्रमाणावर ​भूस्खलन झाले आहे. ​पण हा निसर्गाचा कोप टाळता आला असता, कारण सन २०१५ चे तत्कालीन जिल्हा अधिकारी यांनी जिॲालिजकल प्रोग्रॅमिॅग बोर्ड व जिॲालॅाजिकल डायरेक्टर नागपुर ​आणि या विभागाचे सदस्य सचिव ​यांना सातारा जिल्ह्यातील धोकादायक ४९ ​गावांबद्दल कळवले होते पण संदर्भित  अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष न दिल्याने आज हि परिस्थिती साताऱ्यावर ओढवली असल्याचे सांगण्यात येत आहे.

​पुण्याजवळील माळीण गावावर अतिवृष्टीमुळे डोगरांचा भाग कोसल्यामुळे​ संपूर्ण  गाव नष्ट होण्याची घटना घडली होती​. त्याच अनुशंगाने सातारा जिल्ह्यातील ४९ गावाची यादी तसेच उक्त ४९ गावाचे सर्वेक्षण करणेबाबत तसेच ४९ गावापैकी सर्वात जास्त व तात्काळ धोका उद्भवण्याची शक्यता असणार्या व तात्काळ पुनर्रवसन करणे आवश्यक असणार्या गावाची क्रमवारी निश्चित करुन व तात्काळ पुनर्रवसन करुन देण्याबाबत अहवाल वरीष्ठ वैज्ञानिक भुजल सातारा याच्यामार्फत ​सदस्य सचिव, संचालक जिॲालॅाजी नागपूर याच्याकडे पत्राद्वारे केली होती .

मात्र सातारा जिल्ह्यातील ​या गावांबद्दल नागपूर जिऑलॉजी विभागाने आणि अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना न झाल्यामुळे​ आज जिल्ह्यातील वाई ,महाबळेश्वर , पाटण तालुक्यांतील ३७ लोकांचा जीव गमवावा लागला आहे. आता ​लोकांचे जीव घेल्यानंतर गावाचे पुनर्वसन करू असे मंत्री सांगत आहेत, प्रशासन आर्थिक मदतीची घोषणा करत आहे. हे सगळे आता करून काय उपयोग अशा शब्दात स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

सातारा जिल्ह्यातच प्रशासन मुघल राज्य​,​ कागदी राज्य म्हणुन ओळखले जाते​. अगदी त्याचप्रमाणे फक्त कागदोपत्री पत्रव्यवहार करुन ​फाईल ठीकठाक ठेवण्यात यशस्वी झा​ले. ​ मात्र सर्वसामान्य नागरिकांचा जीव वाचवण्यात प्रशास​नाने कोणतीही काळजी घेतली नाही हे सत्य आता समोर आल्याचे दिसत आहे. 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: