सातारा 

‘धोका वाढलेला, मात्र सरकार सकारात्मक’

सातारा (अभयकुमार देशमुख) :

पूर्वी नैसर्गिक आपत्ती सारखी अशी संकटे 5 ते 10 वर्षानंतर येत असत. मात्र गेल्या दोन वर्षात ही संकटे वारंवार येत आहेत. त्यामुळे धोका वाढलेला आहे, परंतु राज्यातील सरकार पुनर्वसनासाठी सकारात्मक आहे. आम्हीही पाठपुरावा नक्कीच करू असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिले.

पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित झालेले मोरगिरी-आंबेघर, मिरगाव, ढोकावळे या गावातील बाधितांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रविण दरेकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, आमदार जयकुमार गोरे, भारत पाटील, कराड शहर प्रमुख एकनाथ बागडी आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोयना प्रकल्प ग्रस्तांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे सध्या आपल्यावरती मोठं संकट आलंय याची आम्हाला जाणीव आहे. सरकारची पुनर्वसन करण्याची मानसिकता आहे आणि ते लवकरात लवकर करून घेऊ पुढील काळात अशी आपत्ती येऊ नये यासाठी ही उपाययोजना करू.

आंबेघर येथील बाधित लोक मोरगिरी येथील शाळेत स्थलांतरित आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बाधितांच्या सोबत आमटी -भात हे जेवण जेवले.

https://youtu.be/U3GI1Jtynus

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: