पुणे 

एम्क्युअरने ‘यांची’ केली स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती

पुणे :
भारतातील आघाडीच्या औषधनिर्माण कंपन्यांपैकी एक असणाऱ्या एम्क्युअर फार्मास्युटीकल्स लिमिटेडने सुविख्यात पार्श्वभूमीच्या स्वतंत्र संचालकांची नेमणूक करून आपले नेतृत्व आणखी बळकट केले. नुकतीच कंपनीने आपल्या मंडळात वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञानसंपन्न आणि अनुभवसंपन्न अशा चार स्वतंत्र संचालकांची भर घातली.

 

नव्याने संचालक मंडळामध्ये आलेल्या डॉ.शैलेश आय्यंगर, विजय गोखले, श्री.हितेश जैन आणि डॉ.विद्या येरवडेकर यांचा समावेश आहे. यावर्षाच्या सुरुवातीला .बर्जीस देसाई यांनी एम्क्युअर मंडळाच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारला होता. १९९७ पासून आपल्या स्वतंत्र संचालकांमधून अध्यक्ष निवडण्याची कंपनीची प्रदीर्घ परंपरा आहे.

 

जगभरातील ७० हून अधिक देशांत जागतिक पोहोच असलेल्या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या औषधनिर्माण कंपन्यांपैकी एक असणाऱ्या एम्क्युअरचे आपले सामर्थ्य आणखी वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. एम्क्युअर फार्मास्युटीकल्ससाठी नेतृत्वाच्या पातळीवर ही आणखी भर पडल्यामुळे त्यातून त्यांची अनुभव समृद्धता आणि कामकाज आणखी बळकट करण्याकडे असलेली बांधिलकी दिसून येते. कायदा, औषधनिर्माण क्षेत्र, योजना विकास आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातील या नवीन सदस्यांच्या एकत्रित सामर्थ्यातून एम्क्युअरच्या विकासाच्या मार्गात आणखी मुसंडी मारता येईल.

 

एम्क्युअर फार्मास्युटीकल्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश मेहता या नवीन नेमणुकींबद्दल बोलताना म्हणाले, “उद्योगक्षेत्रातील अत्यंत कुशल आणि अलौकिक बुद्धिमत्ता असलेली मंडळी आमच्या संचालक मंडळाचा भाग झाली याचा आम्हांला खूप आनंद होत आहे. नवीन सदस्यांचा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील व्यापक दृष्टीकोन आणि एकत्रित अनुभव यातून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आमच्या धोरणात्मक कामकाजाला आणखी बळकटी देता येईल. संस्थेसाठी हा खूपच उत्साहवर्धक काळ असून संचालक मंडळावर या नवीन सदस्यांच्या येण्याने आणखी नव्या उंचीवर पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: