गोवा 

मांद्रेत काँग्रेसची उमेदवारी कोणाच्या गळ्यात?

पेडणे ​(निवृत्ती शिरोडकर​)​

मांद्रे मतदारसंघाची कॉंग्रेसची उमेदवारी  अजूनपर्यंत कुणाला ती ठरलेली नाही , मात्र मांद्रे मतदार संघातील गट कॉंग्रेस पक्षाने ज्यांच्या नावाची शिफारस करणार त्यावर राज्य समिती चर्चा करून नंतर केंद्रीय समितीकडे नावे पाठवली जाणार आहे . ज्याला कुणाला उमेदवारी देईल ते पक्ष जाहीर करील मात्र आजपर्यंत कुणालाही उमेदवारी जाहीर झाली नाही असे स्पष्टीकरण कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकारांनी मान्द्रेत  उमेदवारी सचिन परब याना देणार कि केवळ त्यांच्याकडून काम करून घेणार आणि तिकीट भलत्यानाच देणार असा  प्रश्न विचारल्यानंतर ते बोलत होते .

तुये येथे धनगर समाजाच्या कुटुंबियाना मांद्रेचे कॉंग्रेस नेते सचिन परब यांनी सोलर मार्फत विजेची सोय केली त्यावेळी गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर हे स्थानिक पत्रकारांकडे बोलत होते .

​​​ ​दरम्यान, कॉंग्रेस पक्षाने गोवा फॉरवर्ड पक्षाकडे युती केली का असा प्रश्न विचारला असता , अजूनपर्यंत आम्ही कुणाकडे युती केली नाही​.  युती स्थानिक नेते व केडर याना विश्वासात घेवून करणार​. विजय सरदेसाई याना २०१७ च्या निवडणुकीत युती का केली नाही​. त्या निवडणुकीत कॉंग्रेसकडे १७ आमदार असताना विजय सरदेसाई यांनी कॉंग्रेसला साथ का दिली नाही​. त्याना आताच युतीची गरज का भासते असा सवाल गिरीश चोडणकर यांनी उपस्थित केला​. २०१७ च्या निवडणुकीत कॉंग्रेस मान्द्रेत कमी पडला का​?​ या प्रश्नाला उत्तर देताना मान्द्रेतील कॉंग्रेसने मुख्यमंत्रीपदावर असलेले ​लक्ष्मीकांत पार्सेकर याना हरवून कॉंग्रेसची ताकत दाखवली होती ,मात्र कॉंग्रेसचे आमदार दयानंद सोपटे यांनी मान्द्रेतील लोकाना ​दिल्लीत जाऊन विकले ,कोण म्हणतो , वीस कोण म्हणतो ३० कोण म्हणतो ५० कोटीला स्वत​:​ला विकले, आणि आता ते विकासाची बाता मारत आहेत . मान्द्रेच्या जनतेचा विश्वास हा कॉंग्रेसवर होता .

२०१९ च्या पोट निवडणुकीनंतर मान्द्रेत कॉंग्रेस पक्ष कुठेच नव्हता त्याला सचिन परब यांनी संजीवनी दिले , त्यांच्यावर आगामी काळात अन्याय कर​​णार का असा सवाल उपस्थित केला त्याला उत्तर देताना गिरीश चोडणकर यांनी सांगितले न्याय अन्याय याची जाणीव कॉंग्रेस पक्ष तिकीट देताना नक्कीच ठेवणार आहे . लोकाना कोण हवा याचा विचार कॉंग्रेस पक्ष संघटना नक्कीच करणार आहे .

७० ते ८० टक्के युवकांना उमेदवारी
आगामी निवडणुकीत युवकाना प्रोत्साहन दिले जाणार का या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश चोडणकर यांनी सांगितले कि कॉंग्रेस पक्ष याही पुढे युवकाना प्रोत्साहन देणार आहे , किमान ७० ते ८० टक्के युवकांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले .

२३ आमदार निवडून येणार ?
गिरीश चोडणकर यांनी बोलताना गोवा फॉरवर्ड पक्षने जशी आता  युतीसाठी घाई केली ती २०१७ साली केली असती तर गोवेकरांच्या हिताचे सरकार स्थापन झाले असते , शिवाय गोवेकरांच्या विरोधात जे प्रकल्प लादले गेले ते बंद झाले असते असा दावा करून आगामी निवडणुकीत कॉंग्रेसचे किमान २३ आमदार निवडून  येतील आणि त्यात युवकाचा जास्त भर असेल असे त्यांनी सांगितले .

हे सरकार मोदी सरकारला मदत करणारे जो क्रोनी क्लब आहे त्याचसाठी तयार केले , १७ आमदार असताना आमच्यासोबत कोणी यायला तयार नव्हते मात्र आज केवळ पाच आमदार असताना अनेक पक्ष युती करायला तयार आहे, असे गिरीश म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: