गोवा 

‘हे सरकार म्हणजे ‘खाओ, पिओ, मजा करो”

पेडणे (प्रतिनिधी):

पेडणेत आलेला पूर हा नैसर्गिक आपत्ती आहे की मानवाने मुद्दामहून घडवून आणलेली आपत्ती आहे. असा प्रश्न करून सरकार निद्रिस्त आहे. हे सरकार अस्तित्वात आहे की हाच प्रश्न आहे. सरकारची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कमी पडली. त्यामुळे राज्यातील अनेक लोकांना पुराचा नाहक त्रास सोसावा लागला. भाजप सरकार “खाओ पिओ मजा करो” या धर्तीवर चालणारे आहे. या सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीही देणेघेणे नाही. सगळीकडे फटिंगपणाच आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे ही आपत्ती शेतकरी आणि सामान्य लोकावर आली आहे. असे मत मगोचे नेते माजी आमदार सुदिन ढवळीकर यांनी इब्रामपूर येथे व्यक्त केले.

यावेळी इब्रामपूर येथे व्यासपीठावर मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर,  पेडणे मतदारसंघाचे मगो नेते  प्रवीण आर्लेकर,  मांद्रेचे मगो नेते  , जीत आरोलकर,  हळदोणे मतदारासंघाचे मगो नेते   महेश साटेलकर, प्रवक्ते  उमेश तळावणेकर, नरेश कोरगावकर,  मगो कार्यकारिणी सदस्य  सुदिप कोरगावकर, माजी सरपंच  अशोक धाऊस्कर, माजी सरपंच  चंद्रशेखर खडपकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इब्रामपूर येथील पुरग्रस्त ग्रामस्थ आणि इतर नागृरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अलिकडे आलेल्या मुसळधार पावसामुळे पेडणे तालुक्यासह राज्यातील अनेक भागात पुर आला. यात अनेक घरे जमिनदोस्त झाली. अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागायती नष्ट झाल्या. वास्तविक धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. ज्यावेळी नदीला भरती असते त्यावेळी धरणाचे पाणी सोडले . म्हणून  हा प्रसंग उद्भवला आहे. ही नैसर्गिक आपत्ती नसून सरकारच्या भोंगळ कारभाराचा नमुना आहे.  सरकारने घडवून आणलेली आपत्ती आहे असे ढवळीकर म्हणाले.

सरकाने  विधानसभेत दिलेले आश्वासन पाळले नाहीः सुदिन ढवळीकर
सरकारने विधानसभेत आश्वासन देऊनही इंटरनेटची सोय खेडोपाडी न करता घाईघाईने आँनलाईन शिक्षण सुरू केले. उत्तर गोवा खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दत्तक घेतलेल्या पेडणे तालुक्यातील इब्रामपूर गावात लोकांना इंटरनेट सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे एकमेकांशी संपर्क साधता येत नाही. अशा परीस्थितीत मुलांना शिक्षण कसे काय घेता येईल. सामान्य माणसाला शिक्षण मिळू नये. हाच सरकारचा यामागील हेतू आहे. खाणी आणि क्रुषी क्षेत्राचा या सरकारने पुरा बट्ट्याबोळ केला असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

खुटवळ येथे बोलताना मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले मगो पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी सर्वसामान्यांसाठी खुप काही केले. सामान्य लोकांच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी गावागावांत शाळा काढल्या. सर्व सामान्यांसाठी कुळ कायदा बनवला. मात्र या सरकारला लोकांची कदर नाही.

मगो आणि काँग्रेस पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात गेलेल्या १२ आमदारांबाबत बोलताना आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले या आमदारांनी देवळात आणि चर्च मध्ये जाऊन पक्ष सोडणार नाही म्हणून शपथ घेतली. प्रमाण झाले आणि हिच शपथ मोडून पक्षांतर केले. याचा परिणाम आज त्यांना आणि लोकांना भोगावा लागत आहे. पक्षांतर आणि माकड उड्या बंद करण्यासाठी मगो पक्षाचे सरकार अस्तित्वात येण्यासाठी मगोचे २१ आमदार निवडून द्यावे. असे आवाहन ढवळीकर यांनी केले.‘वीस वर्षे सत्ता भोगूनही पेडणेचा विकास आजगावकर करु शकले नाही’
यावेळी बोलताना मगोचे प्रवक्ते उमेश तळावणेकर म्हणाले भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी इब्रामपूर गाव दत्तक घेतला. असे असताना तेथील लोकांना आजही मुलभूत गरजा भागविण्यासाठी झगडावे लागत आहे. स्थानिक आमदार मी तुमचा नोकर आहे, तुमचा सेवक आहे असे म्हणून लोकांना याचना करतो. गेली वीस वर्षे या भागाचे नेतृत्व बाबू आजगावकर यांनी केले. माञ ते लोकांच्या समस्या सोडवू शकले नाहीत.  ज्या लोकांनी त्यांना निवडून दिले त्यांनाच नोकरा सारखे वागवतो. भाजपा सारखा फटिंग पक्ष नाही. मात्र मगोवर विश्वास ठेवून मगोचे सरकार येईल यासाठी प्रयत्न करा. असे आवाहन केले.

इब्रामपूर येथे चव्हाटा सभामंडपात झालेल्या एका कार्यक्रमात इब्रामपूर येथील पूरग्रस्तांना मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर , प्रवीण आर्लेकर   यांनी आर्थिक मदत दिली. यावेळी इब्रामपूर येथे सखाराम कळंगुटकर, सुर्यकांत मठकर, नितेश देसाई, अशोक कुबल, सुनील कुबल, शांता शिरोडकर, वसंत सावंत, योगेश पाडगावकर, राजाराम शिरोडकर, संतोष शिरोडकर व रूपेश सावंत आदींना आर्थिक मदत दिली.

त्यानंतर खुटवळ येथे श्री देवी ब्राह्मणी मंदिराच्या सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात मंगेश सावंत, वासुदेव नाईक, विजेता नाईक, राजाराम नाईक, अशोक मेस्त्री, विश्वास मेस्त्री, यशवंत माळयेकर, गुरूदास सावंत व महादेव नाईक यांना सुदिन ढवळीकर, प्रवीण आर्लेकर, जीत आरोलकर, महेश साटेलकर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन म्हापसेकर यांनी केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: