गोवा 

‘मग आमदारांनी ‘या’ घरांना आजवर वीज, पाणी का दिले नाही?’

पेडणे (प्रतिनिधी) :
मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे जर कॉंग्रेसचा त्याग करून भाजपा सरकारात गेले तर मग त्यांनी आपल्याच मतदारसंघातील तुये येथील चार धनगर समाजातील घराना वीज पाणी रस्ते का पोचवले नाही असा संतप्त सवाल गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उपस्थित केला . तुये येथील चार धनगर समाजाच्या घरात ९० वर्षानंतर विजेचे बल्ब मांद्रेचे युवा कॉंग्रेस नेते सचिन परब यांच्या मार्फत सोलार तर्फे विजेचे दिवे पेटवण्यात आले, ९० वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर या घरात दिवे पेटल्यावर घरच्या मंडळीच्या चेहऱ्यावर जे हास्य होते ते पाहण्या योगे होता .

या कार्यक्रमाला युवा कॉंग्रेस नेते सचिन परब , माजी मंत्री संगीता परब , कॉंग्रेस महिला अध्यक्ष बिना नाईक , वरद म्हार्दोलकर , नारायण रेडकर , उत्तर गोवा कॉंग्रेस अध्यक्ष विजय भिके , रेखा महाले , आनंद शिरगावकर, लक्ष्मीकांत शेटगावकर अनिता वाडजी , सरपंच सुहास नाईक , पंच आनंद साळगावकर ,माजी सरपंच किशोर नाईक आदी उपस्थित होते .

गिरीश चोडणकर यांनी बोलताना कॉंग्रेस पक्ष हा गरीबापर्यंत पोचणारा पक्ष आहे . सरकारने ठरवले असते तर या घरापर्यंत कधीच वीज दिली असती . त्यांच्याकडे ती एजन्सी आहे ,मात्र सरकारला त्यांचे पडलेले नाही , सचिन परब यांनी या गरीब कुटुंबियाना विजेची सोय करून सरकार , मुख्यमंत्री , स्थानिक आमदार दयानंद सोपटे आणि धनगर समाजाचे प्रतीतीनिध्व करणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची लक्तरे वेशीवर आणली आहेत, असा दावा केला.

कॉंग्रेसचे जे आमदार दयानंद सोपटे  ज्यांनी मुख्यमंत्री पार्सेकर यांचा पराभव करून जाईट किलर ठरले होते त्यांनी स्वत:ला दिल्ली  येथे करोडो रुपयाना विकले , त्यामुळे त्याना गरीबांचा कळवला नाही . जो स्वत:ला विकतो तो गरीबांचा विकास कसा करणार असा सवाल गिरीश चोडणकर यांनी उपस्थित केला .


माजी मंत्री संगीता परब यांनी बोलताना कॉंग्रेस पक्षाने आता पर्यंत गरिबांच्या विकासाठी प्रयत्न केले . कॉंग्रेस पक्षाचे बळ दिवसेंदिवस वाढत आहे . पूर्वी कॉंग्रेस आमदारावर जे भ्रष्टाचाराचे आरोप होत होते तेच आमदार आज भाजपात आहे , त्यामुळे ते आता भाजपची बी टीम आहे कॉंग्रेस स्वच्छ झालेली आहे , आता भविष्यात कॉंग्रेसची धुरा युवा कार्यकर्त्यांकडे जात आहे त्यामुळे कॉंग्रेसने आगामी निवडणुकीत मांद्रे मधून युवकाना संधी देण्याची मागणी केली .

महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांनी बोलताना भाजपा हे श्रीमंतांचे सरकार आहेत ,त्यामुळे त्यांचे गरिबांकडे लक्ष नाही , आज दिवे पटवून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होत आहे. दोन किलोमीटरवर अंतरावर इलेक्ट्रोनिक सिटी येत आहे तर चार किलोमीटर अंतरावर आमदार सोपटे यांचे घर आहे , मग हे अंधारात  असलेले कुटुंब आमदार दयानंद सोपटे याना कसे काय दिसले नाही असा सवाल उपस्थित केला .

कॉंग्रेस युवा नेते सचिन परब यांनी बोलताना आपण कधी मतांची गणिते केली नाही , किंवा राजकीय लाभ उठवण्यासाठी दिवे पेटवले नाही , गरिबांच्या घरात दिवे पेटतात या पेक्षा दुसरा आनंद आम्हाला नाही असे सांगून या कुटुंबियाना  सर्व त्या सोयी पुरवण्यासाठी आमचे प्रयंत्न असतील असे सांगितले .

धनगर कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करताना  घरात वीज पेटल्यावर खूप आनंद होतो  वीज नसल्याने मुलांची शिक्षणे अडली , इन्टरनेट सेवा नसल्याने शिक्षणही अडले अशी व्यथा कुटुंबीयांनी मांडली. यावेळी वरद  म्हार्दोलकर , विजय भिके , व नारायण रेडकर यांनी भाषणे केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: