कला-साहित्य

“चिवचिवणारी वाट’मध्ये उमटले संतसाहित्याचे सार’

पणजी (प्रतिनिधी) :
डॉ. गोविंद काळे यांची जीवनवाट अनोखी आहे. समृध्द विचारांचा वारसा त्यांना लाभला आहे. ते पट्टीचे वक्ते तर आहेतच सोबत त्यांच्या लिखाणातून त्यांचे विचार अत्यंत सहज, साध्या सोप्या पध्दतीने उमटतात. ‘चिवचिवणारी वाट’ हे पुस्तक म्हणजे वाचकांसाठी वैचारिक मेजवानीच असून या पुस्तकामध्ये संतसाहित्याचे सार यथार्थपणे उमटले आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि देशाचे माजी कायदामंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी केले.

सहित प्रकाशनच्यावतीने प्रकाशित डॉ. गोविंद काळे यांच्या ‘चिवचिवणारी वाट’ या ललित लेख संग्रहाचे अनौपचारिक प्रकाशन काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी शिक्षणमंत्री आणि संतसाहित्याचे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या हस्ते झाले. गोपाळराव मयेकरांनी प्रस्तावना लिहिलेले आणि त्यांच्या हस्ते प्रकाशन झालेले ‘चिवचिवणारी वाट’ हे शेवटचे पुस्तक ठरले.

या अनौपचारिक प्रकाशनानंतर अ‍ॅड. रमाकांत खलप आणि लेखिका पौर्णिमा केरकर यांनी या पुस्तकाच्या अनुषंगाने आपले विचार व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केले. त्यावेळी रमाकांत खलप यांनी सदर मत मांडले.

या पुस्तकातील लेख, त्यांचे शिर्षक, लेखातील विविध दाखले आणि त्यांचा सर्वसामान्य आयुष्यासोबतचा संबंध लेखक या पुस्तकात खूप सहज जोडतात. यातील प्रत्येक लेख हा आटोपशीर असून तो वाचताना वाचक अंतर्मुख होऊन जातो. साध्याच घटना पण त्या जीवनाशी जोडून घेतल्याने या पुस्तकात एक वेगळेच तत्वज्ञान आकारास येते. लेखकामध्ये एक प्रकारची अस्वस्थता असून ही अस्वस्थताच या लिखाणामागील प्रेरणा असल्याचे जाणवते, असे यावेळी पौर्णिमा केरकर यांनी नमूद केले.

हे पुस्तक म्हणजे आपणच आपल्याशी साधलेला संवाद असून, प्रत्येकाने तो स्वत:सोबत केला पाहिजे, असे आवाहन यावेळी लेखक डॉ. गोविंद काळे यांनी आपल्या मनोगतामध्ये केला.

या पुस्तकावर मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार ‘राष्ट्रमत गोवा’ या युट्यूब चॅनेलवर ‘चिवचिवणारी वाट’ या विशेष व्हिडीओमध्ये पाहता येतील.

https://www.youtube.com/watch?v=C9iveikLMQ0&t=9s

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: