सातारा 

‘काले नांदगाव, टाळगाव पुलाची दुरुस्ती करण्याकडे भर द्या’

कराड (अभयकुमार देशमुख) :

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, राहती घरे यासह जनजीवनावर अपरिमित नुकसान ओढवले आहे. नुकसानग्रस्त लोकांच्या पाठीशी राज्य शासन ठाम आहे. प्रशासनाने लोकांना अधिकाधिक मदत पोहचवावी, असे सांगून कराड दक्षिण मतदारसंघातील दक्षिण मांड नदीच्या पुरामध्ये नुकसान झालेल्या बाधितांना भरपाई देण्यास अग्रक्रम ठेवावा. नदीवरील काले नांदगाव, टाळगावच्या पुलांच्या दुरुस्त्या करण्याच्या सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. व पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळवण्यासाठी प्राधान्यक्रम ठेवावा. असे त्यांनी यावेळी प्रामुख्याने सांगितले.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (गुरुवारी) कराड दक्षिण पूरग्रस्त (अतिवृष्टी) भागात दौरा केला. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदिप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, सार्वजनिक बांधकाम उपविभागचे उपअभियंता संजय दाभोळे, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता आर. जे. पाटील, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, जलसंपदा विभागाचे संजय धोत्रे, जलसंधारणाचे श्रीकांत आढाव, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. राख, महसूल विभागाचे मंडलाधिकारी नागेश निकम, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, नरेंद्र नांगरे – पाटील, नितीन थोरात, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, उदयआबा पाटील – उंडाळकर, पैलवान तानाजी चवरे, देवदास माने यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. चव्हाण यांनी काले येथील मांड नदीवरील पुलाची पाहणी केली. या पुलाची उंची वाढवता येईल का? यासंबंधी प्रशासनाकडून अधिक माहिती घेतली जाईल, असे उपस्थितांना सांगितले. नांदगाव येथील पुलाची ​​पाहणी करताना त्यांनी सरपंच हंबीरराव पाटील, उपसरपंच अधिकराव पाटील व ग्रामस्थांशी संवाद साधला. व संबंधित अधिकाऱ्यांना नांदगाव पुलाच्या कठड्यांची तात्पुरती दुरुस्ती करावी, असे सांगून योग्य ती खबरदारी घेवून हा पूल वाहतुकीस खुला करावा असे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी पुलावरील वाढती प्रवाशी व ऊस वाहतूक विचाराधीन घेवून या उंची वाढवावी. तसेच दुहेरी वाहतूक व उंच पूल व्हावा, अशी मागणी केली. यावर आ. चव्हाण शासनाकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक जगन्नाथ माळी, माजी सरपंच टी. के. पाटील, डॉ. नरेंद्र माळी, सागर कुंभार, सयाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे, प्रशांत सुकरे, विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. चव्हाण यांनी उंडाळे येथील जिंती रोडवरील पूल व तुळसण फाट्यावरील पुलाची पाहणी केली. जिंती रोडवरील पुलाचा भराव व जवळच्या बंधाऱ्याच्या सांडवा दुरुस्तीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तर तुळसण फाट्यावरील पुलावरील रस्ता उखडला आहे. हे काम लवकर होईल. तोपर्यंत रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्याची सूचना दिली. यावेळी उपसरपंच बापूराव पाटील, उदय पाटील, शैलेश पाटील, व्ही. टी. पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

टाळगाव येथील गावाजवळच्या पुलाची व खचलेल्या भरावाची पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या हस्ते पूरग्रस्त कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच शालन मोहिते, जयवंत जाधव, गणेश काळे, उत्तमराव साळुंखे, धनाजी देशमुख, सुभाष पाटील, विकास देशमुख, प्रगतशील शेतकरी संजय जाधव – उंडाळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सवादे येथील बांदेकरवाडी येथील साकव पुलाचा पडलेला भराव व तेथील नुकसानीची पाहणी केली. व पूल दुरुस्तीच्या कामात गती देण्यास सांगितले. यावेळी नितीन थोरात, सरपंच लक्ष्मी सुतार, उपसरपंच पुजाराणी थोरात – पाटील, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बाजीराव थोरात, माजी चेअरमन निवास थोरात, उदय थोरात, माजी उपसरपंच सचिन थोरात व ग्रामस्थ उपस्थित होते.

आ. चव्हाण यांनी बांदेकरवाडी येथे साकव पुलाच्या पाहणीवेळी ट्रॅक्टर च्या ट्रॉलीमध्ये बसून प्रवास केला.  बांदेकरवाडी येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गावातील श्री हनुमान मंदिरात ग्रामस्थांच्या समवेत जेवण केले. यावेळी पृथ्वीराज बाबांचा साधेपणा पहायला मिळाला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: