गोवा 

‘​चंद्रकांत बांदेकरांच्या मारेकऱ्यांना त्वरित पकडा’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
सक्राळ तोरसे येथील रेती व्यवसाईक चंद्रकांत बांदेकर यांचा २ जुलै रोजी दिवसाढवळ्या खून करण्यात आला होता​. या घटनेला ​आता ​महिना उलटण्याच्या मार्गावर आहे , मात्र अजून पर्यंत पोलिसांनी ​संशयितांना अटक केली नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने पेडणे पोलीस स्टेशनवर २९ रोजी धडक ​नेत पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांची भेट ​घेतली आणि बांदेकर कुटुंबियाना न्याय द्यावा अशी मागणी केली.

 

शिवसेनेने २९ रोजी पेडणे पोलीस स्टेशनवर धडक दिली त्यावेळी शिवसेना उपराज्यप्रमुख सुभाष केरकर , शिवसेना महिला नेत्या ऐश्वर्या साळगावकर , राजाराम पाटील ,सुशांत पावसकर , दिवाकर जाधव , विलास मलिक,राजन पार्सेकर दीपक येरम , कृष्णा कोरगावकर समित पवार, संजय पवार मेहबूब नालेबन  आदी उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी माहिती देताना तपास चालू आहे​. ​संशयितांना लवकरच पकडले जाईल मुख्य ​संशयिताचे रेखाचित्र प्रसारित केले आहे​. रेती व्यवसायाशी संबधित मजूर २ तारखेला येणार आहे त्यानंतर तपासाला गती मिळेल , बांदेकर कुटुंबियांचा पोलिसावर पूर्ण विश्वास आहे . तपासाला गती दिली जात आहे ,मागचे पंधरादिवस जिल्हा पोलीस अधिकारीही उपस्थित राहून मार्गदर्शन करत असतात असे सांगितले .

शिवसेनेचे उपाध्यक्ष सुभाष केरकर यांनी बोलताना आम्ही बांदेकर कुटुंबियाना अधून मधून मिळत असतो , त्यांचीही मागणी असते कि आम्हाला न्याय मिळवून द्यावा म्हणून , त्याच पाश्वभूमीवर शिवसेनेने पोलीस निरीक्षक दळवी यांची भेट घेवून चर्चा आणि अटक करण्याची मागणी केली आहे असे सांगितले . पोलीस निरीक्षकाने  त्वरित न्याय मिळवून  देण्याचे आश्वासन दिले आहे .

पोलीस तपास खूप धीम्या गतीने चालू आहे. पिडीतीना अजून न्याय मिळत नाही , त्याला आता गती द्यावी अशी मागणी केली . उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या मतदार संघात  दिवसा ढवळ्या नागरिकाचा खून होतो , त्या विषई आमदार या नात्याने त्यांनी कोणता पाठपुरावा केला असा सवाल सुभाष केरकर यांनी उपस्थित केला , जर बांदेकर कुटुंबियाना न्याय मिळाला नाही  तर शिवसेना रस्त्यावर येवून आंदोलन करणार असा इशारा दिला.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: