गोवा 

”अटल सेतू’चा खर्च दुपट्टीवर कसा पोहोचला?’

पणजी :

राजधानीतील अटल सेतूच्या बांधकामाचा सुरुवातीचा खर्च 355 कोटी होता. तो खर्च वाढून 793 कोटी 91 लाखंवर पोचला. हा खर्च एवढा वाढला कसा, असा प्रश्न पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटेंनी केला. सरकारनं या पुलाचा वाढीव खर्च कर्ज घेऊन केला. त्या कर्जावर सरकार 142 कोटी रुपयांच व्याज देतंय ही त्याहून जास्त गंभीर बाब आहे. एवढा खर्च वाढूनही या पुलाचं कामाचा दर्जा अतिशय खराब आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

​पुलावर आणि पुलाच्या जोडरस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले. सरकारचे जीएसआयडीसी महामंडळ काय करतंय? कामाच्या दर्जाबाबत जीएसआयडीसीने लक्ष का दिलं नाही? असे सवाल खंवटेंनी उपस्थित केले. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचा आरोपही खंवटेंनी केला आहे.

rohan khaunte
या सर्व प्रकारावर संबंधित कंत्राटदार, सल्लागार यांची चौकशी करण्याची मागणी खंवटेंनी यावेळी केली. याबाबत लोकायुक्तांकडे दाद मागून काही फायदा होणार आहे. कारण लोकायुक्त कायद्याची सरकारने हवाच काढून घेतली. याबाबत इतर कायदेशीर मार्ग स्वीकारावे लागणार असल्याचं खंवटें म्हणाले​ आहेत​.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: