लेखक्रीडा-अर्थमत

‘अशा’ प्रकारे करा कंपनीचे रिब्रँडिग

– प्रभाकर तिवारी

कंपनीचे नाव, लोगो, वेबसाइट, अॅप आणि सध्याच्या डिझाइन्स बदलण्यापासून ते नव्या सुविधा व उत्पादने आणण्याद्वारे रिब्रँडिंग हे प्रभावीपणे बदलाशी संवाद साधते आणि मार्केटमध्ये कंपनीचे एक अढळ स्थान निर्माण करते. रिब्रँडिंग कँपेनद्वारे कंपनीची प्रगती होते किंवा तिचे नुकसान होते. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, रिब्रँडिंगसाठी सुसंवाद आणि टीमवर्कची गरज आहे. कोणत्याही विशिष्ट विभागाचे हे काम नाही. त्यामुळे रिब्रँडिंग प्रक्रियेचे यश अनेक घटकांवर अवलंबून असते.

 

नेतृत्वाची वचनबद्धता:
रिब्रँडिंग प्रक्रियेत कंपनीच्या वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची असते. कंपनीची नवी ओळख सादर करण्याच्या कल्पनेच्या दृष्टीकोनावर हे पूर्ण कँपेन अवलंबून असतके. रिब्रँडिंगच्या कारणांवर नेतृत्वाचे समाधान नसेल, तर हे प्रक्रियेत दिसून येईल आणि याचे परिणामही त्यावर अवलंबून असेल. त्यामुळे कँपेनला एक दिशा देण्यासाठी शीर्ष अधिकाऱ्यांना हे कँपेन स्वत:च्या हाती घअयावे लागेल. वरिष्ठ अधिकारी ब्रँडमध्ये सकारात्मक बदल तेव्हाच करू शकतात, जेव्हा या प्रक्रियेतील सर्व हितधारकांचे मत ते ऐकून घेतील. नवी संकल्पना अंगीकारणे, एक नवा दृष्टीकोन स्वीकारणे आणि तसे ध्येय ठेवणे यासारख्या घटकांवर काम केले पाहिजे. दमदार नेतृत्वासाठीच्या पारंपरिक पद्धतीपर्यंत हे मर्यादित नाही.

 

योजना आखणे:
एक योजना आखणे हा रिब्रँडिंग प्रक्रियेचा पाया आहे. ब्रँडची नवी ओळख सादर करण्याची संकल्पना जाहीर करावी लागेल. यात लाँचिंगच्या तारखेपासून प्री-इव्हेंट आणि पोस्ट इव्हेंटचा सराव इथपर्यंत सर्व समाविष्ट असेल. मूळात, हे प्रत्येक विभागाने अंतिम टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी  चेकपॉइंटच्या मुदतीसह अंमलात आणायचे हे कॅलेंडर आहे. कंपनीची नवी स्थिती टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा दमदार धोरण आखावे लागेल. आपण आपला टार्गेट ऑडियन्स ओळखला असेल, तेव्हाच हे शक्य होईल. असे नसेल तर आपल्याला ग्राहकांचा डेटा पाहम्याची आवश्यकता असू शकते. अखेरीस, नेहमीच बाजारातील इतर स्पर्धकांच्या रिब्रँडिंग प्रक्रियेवर एक नजर टाका. आपल्यासाठी काय उपयुक्त ठरु शखते, यानुसारच आपल्या योजनेत अनेक गोष्टींचा समावेश करा.

 

योग्य मार्केटिंग:
तुम्ही जगातील सर्वात चांगल्या सेवा देत असाल, मात्र लोकांना याविषयी माहितीच नाही तर आपली किती उत्पादने बाजारातील उत्पादनांपेक्षा चांगली आहेत आणि कशी चांगली आहेत, यावर विचार करून काहीच फायदा नाही. प्रभावी मार्केटिंग तेच आहे, जे आपल्या उत्पादनांना कंपनीतून ग्राहकांपर्यंत घेऊन जाईल. रिब्रँडिंगच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कोणत्याही मार्केटिंग कंपनीसोबत तुम्ही भागीदारी करू शकता. एका प्रोफेशनल रिब्रँडिंग पार्टनरसोबत काम केल्यास नवा दृष्टीकोन, नवी दिशा आणि आपल्या गुंतवणुकीवर लाभही मिळू शकतो. आपल्या मार्केटिंगद्वारे सोशल मिडिया वेबसाइटवरील सर्व क्षेत्रांत चर्चा होतेय, याची खात्री करा. तसेच कंपनीच्या टार्गेटसाठी काम करणाऱ्या प्रक्रियेवर नजर ठेवा. निर्धारीत लक्ष्य प्राप्त न करणाऱ्या प्रक्रिया चालू ठेवणे टा‌ळा.

 

योग्य कंटेंटसह प्रभावी प्रसार:
कंटेंट या माध्यमाद्वारे कंपन्यांना रिब्रँडिंगविषयी आपल्या ऑडियन्ससोबत प्रभावीपणे संवाद साधण्यास मदत होते. तसेच कंपनीचा वारसा प्रभावीपणे सांगण्यास मदत होते. एक बिझनेस कोणत्याही स्वरुपात स्वत:ची कहाणी सांगत असतो.- टेक्स्ट, छायाचित्र, व्हिडिओ किंवा ऑडिओ. आपल्या ब्रँडच्या सभोवती एक संमोहक कथा, जी वारशातून ताकद मिळवते, अशी कथा सांगितल्यास नवी ओळख बनवण्यास मदत होते. याद्वारे दोन उद्देश पूर्ण होतात. पहिला- भावनात्मक संबंध तयार करणे आणि दुसरे, परिवर्तन सुरु करण्याची समज प्रदान करणे. इमर्सिव्ह कंटेंटद्वारे कंपनीसाठी पुनर्निर्माण का महत्त्वाचे आहे, हे व्यक्त करण्यास मदत मिळेल. विविध माध्यमांद्वारे हे ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे आहे.

 

यशाचा मागोवा घेणे:
रिब्रँडिंगचे प्रयत्न सुरु होतात, तेव्हा त्याविषयी विसर पडता कामा नये. हा प्रवास रोमांचक आणि आव्हानात्मक असा दोन्ही प्रकारे असू शकतो. मात्र हे किती सार्थक आहे, हे परिणामांनंतरच कळते. त्यामुळे रिब्रँडिंगच्या परिणामांचा नेहमी मागोवा घेत रहा. ग्राहक यावर काय प्रतिक्रिया देतात, माध्यमांचे काय मत आहे, सोशल मीडियावर काय चर्चा आहे, हे पहात रहा. कदाचित, परिणाम आपल्या अपेक्षेनुरूप नसतील किंवा ते सुखद आश्चर्यकारक असू शकतात. काहीही असो, यातून नेहमीच शिकण्यासारखे असते. अखेरीस, असे म्हणता येईल की, रिब्रँडिंगची प्रक्रिया खूप मोठी असू शकते. मात्र या प्रवासाद्वारे कंपनीला स्वत:ची क्षमता दिसून येते. ज्या घटकांवर मेहनत घेण्याची गरज आहे, ते स्पष्ट होते. ब्रँड पोझिशनिंग ही स्वत:तच एक निरंतर चालणारी आणि प्रगतीशील प्रक्रिया आहे. केवळ एक रिब्रँड लाँचिंगद्वारे ती समाप्त होत नाही. त्यासाठी सर्वोत्तम संभाव्य पद्धतीने सर्व्हिस डिलिव्हरीची सुनिश्चिती करण्यासह आपल्या दर्शकांपर्यंत सर्वोत्कृष्ट संदेश पोहोचवण्याचेच उद्दिष्ट समोर ठेवा.

 

​(लेखक एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर  आहेत.)

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: